आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत साहित्याबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य; परिसंवादात गदारोळ, व्यासपीठावर धक्काबुक्की, एकमेकांच्या हाताला धरून ओढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : संत साहित्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत लातूर येथील एका सायं दैनिकाच्या संपादकाने परिसंवाद सुरू असताना माइकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. आयोजन समितीपैकी काही जण व्यासपीठावर चढून संपादकाला खाली नेण्याचा प्रयत्न करत असताना धक्काबुक्की, रेटारेटी झाली. पोलिसांनी संपादकाला संमेलनस्थळापासून दूर हलवले.

शाहिर अमर शेख मंचावर 'संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न आल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ' या विषयावरील परिसंवादात संत साहित्यिक मुरहरी केळे यांचे मनाेगत सुरू होते. दरम्यान, व्यासपीठावर लातूर येथील एका सायं दैनिकाचे संपादक डॉ. जगन्नाथ पाटील एका सहकाऱ्यासह दैनिकाच्या प्रती वाटू लागले. वर बसलेल्या साहित्यिकांनीही प्रती घेऊन वाचण्यास प्रारंभ केला. त्याच वेळी पाटील यांनी माइकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी केळे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच उभ्या काहींनी त्यांना 'नंतर बोला' म्हणत खाली नेण्याचा प्रयत्न केला. 'संत साहित्यामुळे बुवाबाजी निर्माण होत नसते, कृपया बाेलू द्यावे,' असे म्हणून पाटील यांनी विनंती केली. मात्र काहींनी त्यांना ओढत खाली नेण्याचा प्रयत्न केला. डॉ. पाटील यांनी 'बाउन्सर ठेवलेत का,' असे म्हणत त्यांना विरोध केला.

पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

पोलिसांनी पत्रकारांनाही धक्काबुक्की करत डॉ. पाटील यांना भेटू दिले नाही. सुरुवातीला डॉ. पाटील काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आयोजक व पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर डॉ. पाटील यांनी काहीच बोलायचे नाही, असे म्हणून सर्वांनाच टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, डॉ. पाटील हे काही प्रकाशनाची पुस्तके साहित्य दालनातील गाळा क्र. ३४ मध्ये विक्री करत आहेत.

साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भावनांशी सहमत : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

समारोपाला अनुपस्थित; फ्रान्सिस दिब्रिटोंवर मुंबईत उपचार

उस्मानाबाद : ९३ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाच्या उद्घाटनानंतर उपचारांसाठी मुंबईत परतले. होलिक्रॉस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संमेलनाच्या समारोपाला ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही, अशी माहिती संमेलनाच्या आयोजकांनी दिली आहे.

व्यासपीठावर एक व्यक्तीने अचानक केला माइकचा ताबा घेण्याचा प्रयत्न

बातम्या आणखी आहेत...