Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi movie Palshichi PT's Poster out

पीटी उषा यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा? 'पळशीची पीटी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 04:25 PM IST

मराठी मातीतला सिनेमा सातासमुद्रापार नेणाऱ्या साताऱ्यातील दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचा बहुचर्चित सिनेमा 'पळशीची पीटी' च

  • Marathi movie Palshichi PT's Poster out

    एन्टटेन्मेंट डेस्क: मराठी मातीतला सिनेमा सातासमुद्रापार नेणाऱ्या साताऱ्यातील दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचा बहुचर्चित सिनेमा 'पळशीची पीटी' चे पोस्टर अखेर प्रदर्शित झाले आहे.

    'शिक्षक दिना'सारख्या अनमोल दिवसाच्या मुहूर्तावर 'पळशीची पीटी' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या शिरपेचात संस्कृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासन विशेष पुरस्कार, कान्स फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल सारखे सोनेरी पंख लागले गेले आहेत.

    'पळशीची पीटी' हे नावचं एक वेगळी कुतुहुलता निर्माण करणारं असल्या कारणाने प्रेक्षकवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा "पीटी उषा" यांच्या जीवनावर तर आधारीत नाही ना...? असे तर्क वितर्क सध्या लावण्यात येत आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार हा सिनेमा नेमक्या कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे याची माहिती दिग्दर्शकांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.

Trending