आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहायला मिळणार लग्नामध्ये पिपाणी वाजवणाऱ्या तरुणाची अनोखी प्रेमकथा, 'तत्ताड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचे कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढले आहे.

चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, गिरीजा झाड, सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर, काका शिरोळे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावनिक कथा मांडणारा आणि उत्तम संगीताचा आनंद देणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता प्रेक्षकांना २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.