Home | Mukt Vyaspith | Poetry of Dnyanesh Dnyanesh Wakudkar in divyamarathi

'देवेन्द्र म्हणाले नारदमुनी...!' कवितेतून जाणून घ्‍या महाराष्‍ट्रातील राजकीय परिस्‍थ‍िती

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 11, 2016, 01:08 PM IST

महाराष्‍ट्रातील राजकीय घडामोडीवर ख्‍यातर्कीत कवी तथा 'सखे साजणीकार' ज्ञानेश वाकुडकर यांनी कवितेतून केलेले भाष्‍य खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 • Poetry of Dnyanesh Dnyanesh Wakudkar in divyamarathi
  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या मंत्रिमंडळाचा विस्‍तार केला. दरम्‍यान, शिवसंग्रामचे विनायक मेटे वगळता इतर मित्र पक्षांना 'लाल' दिवा दिला. तसेच पक्षातील पूर्वीच्‍या मंत्र्यांचे खातेपालट करून अधिकार कमी केले. या सर्व घडामोडीवर ख्‍यातर्कीत कवी तथा 'सखे साजणीकार' ज्ञानेश वाकुडकर यांनी कवितेतून केलेले भाष्‍य खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...


  देवेन्द्र म्हणाले नारदमुनी...!


  देवेंद्र म्हणाले, नारदमुनी
  स्वाभिमान वाले उरले का कुणी?
  असल्यास त्यांची 'सिक्रेट' धुणी
  अहवाल सादर करावा !


  'जळगाव' बऱ्यापैकी धुवून झाले
  वास मारतात 'बीड'वाले
  बापाची 'लीज' कुठवर चाले
  कैसे यांना सांगावे ?


  दमलेत तुतारी फुंकणारे
  भलतीकडून गेले वारे
  वाघ पिंजऱ्यात दडले सारे
  बाया-पोरांना बघू द्या !
  तरीही बारीक लक्ष ठेवा
  वाटल्यास डबल कुलूप लावा
  चुकून 'बारामती'चा धावा
  करू नये वाघाने !


  नारद म्हणाले, देवेन्द्र भाई
  वाघ बाहेर येणार नाही
  चिंता करू नका काही
  शिकार सोपी नसते हो !


  तुम्ही चिंता नका करू
  वाघाच्या मिशा धरू धरू
  तिकडे खेळही झाला सुरू
  आपण डोळे मिटावे !


  तसेच पँथर चारोळीवाला
  मोठ्या सर्कशीत भरती झाला
  हर्षवायू जाहला बिचाऱ्याला
  स्वतःचे नाव आठवेना !


  ..आणि आपला तो खंजीर वाला
  भवानी तलवार समजतो स्वतःला
  म्हणे, माझ्यावर अन्याय झाला
  उपटतो म्हणाला काहीतरी !
  मात्र तुमची मानतो कला
  बकरीचा सरळ वाघोबा केला
  जुना वाघ कोमात गेला
  तुम्ही विदेशी उडाले !

  हॅलो - 9822278988

Trending