आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It's Party Time: 'बापमाणूस' 200 नाबाद, हटके पद्धतीने कलाकारांनी केले सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या 'बापमाणूस' या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनचपसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. 

 

या मालिकेने नुकताच 200 भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. 200 भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार पण हा आनंदाचा क्षण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 100 भाग पूर्ण केल्यावर त्यांनी त्यांचा आनंद अंडरप्रिव्हिलेज मुलांसोबत साजरा केला. यावेळी 201 व्या भागाचं काम चालू करायच्या आधी त्यांनी संपूर्ण टीम जिच्यामुळे ही मालिका यशस्वीरित्या 200 भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले. हा आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगितले की, कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 
या मोठ्या दिवसा विषयी बोलताना, सुयश टिळक म्हणाला, "200 भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. 'बापमाणूस' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही बापमाणूसच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे ही मालिका 200 भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकलीआणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मनू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अशा करतो."

बातम्या आणखी आहेत...