आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकलंत का... 'बापमाणूस' घेणार प्रेक्षकांचा निरोप, यादिवशी प्रसारित होणार आहे शेवटचा एपिसोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने 250 पेक्षा जास्त भागांचा यशस्वी प्रवास पार केला आणि हा प्रवास आता शेवटाला आला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

 

सशक्त कथानक असलेली मालिका म्हणून बापमाणूस सर्व प्रेक्षकांची आवडती ठरली. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी सर्व कास्ट आणि क्रू भावनिक झाली. मालिकेचा शेवट म्हणजे हॅप्पी एंडिंग असणार आहे पण ही मालिका शेवट पर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवील. मालिकेचा संपूर्ण प्रवास संपूर्ण टीमसाठी अविस्मरणीय होता. 

या प्रवासाबद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक हर्षद परांजपे म्हणाले, "बघता बघता वेळ कसा निघून गेला आणि या मालिकेचा शेवटापर्यंत कधी पोहोचलो ते कळलंच नाही. हा प्रवास अत्यंत रंजक होता. सगळ्यांनी एकत्र एकजुटीने काम करून ही मालिका आणि मालिकेचा प्रवास यशस्वी बनवला. सेटवरती आमचं एक कुटुंबच तयार झालं. आता लवकरच या मालिकेचा शेवट प्रेक्षक पाहू शकतील. इथंवरच्या या यशस्वी प्रवासाचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमलादेतो. सगळ्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीनेमुळे ही मालिका आम्ही प्रेक्षकांसाठी रंजक बनवू शकलो."

बातम्या आणखी आहेत...