आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते 200 भागांच्या पुर्ततेचं. या खास क्षणांचे औचित्य साधत केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.
या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर-नवाथे यांनी याप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला, ‘मालिकेचे दोनशे भाग कधी पूर्ण झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचं छान कुटुंब तयार झालंय. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा अशी भावना सारिका निलाटकर यांनी व्यक्त केली.’
खास बात म्हणजेच लवकरच या मालिकेत अनिताच्या सासूची एण्ट्री होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती बोवलेकर अनिताच्या सासुची भूमिका साकारणार आहे. अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या अनिताच्या आयुष्यात सासुच्या येण्याने नवी संकटं उभी रहणार आहेत. या कठीण प्रसंगाचा सामना अनिता कश्या पद्धतीने करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.