आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारी फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेतील मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत.
या मालिकेने नुकताच 400 भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. 400 भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे ही मालिका यशस्वीरित्या 400 भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगितले की, कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मोठ्या दिवसाविषयी बोलताना, हृता दुर्गुळे म्हणाली, ''400 भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही फुलपाखरूच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे ही मालिका 400 भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकली आणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अशा करते."
मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेला, मानसची भूमिका करणारा यशोमन आपटे म्हणाले, “हा टप्पा पार केल्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आमच्या सर्व चाहत्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. हा एक सुंदर प्रवास होता आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.