Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Serial Tula Pahte Re Romantic Track

'तुला पाहते रे'मध्ये दिसणार रोमँटिक ट्रॅक, विक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागणी!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 01:15 PM IST

हा महत्वाचा क्षण येत्या 9 डिसेंबर रोजी 'तुला पाहते रे' या मालिकेच्या 1 तासाच्या विशेष भागात बघायला मिळणार आहे.

  • Marathi Serial Tula Pahte Re Romantic Track

    छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे.

    वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि वयामध्ये फरक आहे आणि म्हणूनच काही लोकांना त्या दोघांनी एकत्र येणं मान्य नाहीये. त्यांच्या प्रेमाचा प्रवास खडतर असेल की सोपा हे तर वेळच ठरवेल, पण तूर्तास विक्रांत सरंजामे ईशाला लग्नाची मागणी घालण्याचा सराव करताना दिसत आहे. सगळा धीर आणि हिम्मत एकवटून विक्रांत ईशाला लग्नासाठी मागणी घालणार आहे. विक्रांतची मागणी घालण्याची पद्धतदेखील तितकीच हटके आणि रोमांचक असणार आहे. इतक्या हटके पद्धतीने मागणी घातल्यावर इशाचं उत्तर हो असेल यात तर शंकाच नाही. विक्रांत आणि ईशा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण येत्या 9 डिसेंबर रोजी 'तुला पाहते रे' या मालिकेच्या 1 तासाच्या विशेष भागात बघायला मिळणार आहे.

  • Marathi Serial Tula Pahte Re Romantic Track
  • Marathi Serial Tula Pahte Re Romantic Track

Trending