• Home
  • News
  • Marathi TV actress kills her daughter and then commits suicide because of financial crisis

Bollywood / मराठी टीव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये बिकट आर्थिक परिस्थितीचे सांगितले कारण 

गळा दाबून केली मुलीची हत्या

दिव्य मराठी वेब

Aug 11,2019 02:32:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : मराठी टीव्ही अभिनेत्री प्रज्ञा पार्कर हिने आपली 17 वर्षांची मुलगी श्रुतीची हत्या करून आत्महत्या केली. ही घटना महाराष्ट्रातील कलवा शहरातील आहे. 40 वर्षांच्या प्रज्ञाने सुसाइड नोटदेखील सोडली आहे. अभिनेत्रीने खराब आर्थिक परिस्थितीमुळे हे पाऊल उचलले.

मिळत नव्हते काम...
श्रुती 12 वी कक्षेतील विद्यार्थिनी होती. सीनियर पोलीस इंस्पेक्टर शेखर बागडेने सांगितले की, अभिनेत्रीने आपल्या सुसाइड नोटमध्ये सांगितले की, तिला सध्या काम मिळत नव्हते. तिच्या पतीलादेखील बिजनेसमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

गळा दाबून केली मुलीची हत्या...
अभिनेत्रीचा पती जेव्हा जिमला गेलेला होता. तेव्हा ही घटना घडली. शनिवारी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान प्रज्ञाने सुसाइड केली. तिचा पती जिममधून परतल्यावर त्याने खूप वेळ दरवाजा वाजवला पण आतून कुणाचाही आवाज आला नाही. त्यानंतर दरवाजा तोडला गेला. रूममध्ये प्रज्ञा पंख्याला लटकलेली होती तर मुलगी श्रुतीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. प्रज्ञाने मुलीचा गळा दाबला होता ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

X
COMMENT