आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या लोकसभेत मराठवाड्यातून निवडून गेले होते सात खासदार; नांदेड व उस्मानाबाद राहिले काँग्रेसचे मजबूत गड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली तेव्हा मराठवाड्यातून ७ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. सातपैकी पाच काँग्रेसचे तर बीडमधून पीडीएफचे रामचंद्र परांजपे आणि परभणीतून नारायण वाघमारे (पीडब्ल्यूपी) विजयी झाले होते. त्या वेळी जालना, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हते. उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेडमधून त्या वेळी दोन खासदार लोकसभेत पोहोचले होते.


२६ जानेवारी १९५० रोजी भारत सरकार अधिनियम १९३५ हटवून भारतीय संविधान लागू करण्यात आल्यानंतर लोकशाही मार्गाने सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या कालावधीत देशात सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येऊन १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली. ४८९ सभासद संख्येच्या पहिल्या लोकसभेत हैदराबाद प्रांतात असलेल्या मराठवाड्यातून ७ खासदार निवडून गेले. यात नांदेडचे दोन्ही मतदारसंघ राखीव होते. या दोन मतदारसंघांतून शंकरराव टेळकीकर आणि डॉ. देवराव कांबळे-पाथ्रीकर हे दोघे काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले. औरंगाबादमधून सुरेशचंद्र श्रीप्रसाद आर्य (काँग्रेस), बीडमधून रामचंद्र गोविंद परांजपे (पीडीएफ), अंबडमधून हनमंतराव वैष्णव (काँग्रेस), परभणीतून नारायणराव वाघमारे (पीडब्ल्यूपी) आणि उस्मानाबादेतून राघवेंद्र श्रीनिवास राव असे ७ जण निवडून गेले होते.


उस्मानाबाद मतदारसंघातून सलग १० वेळा काँग्रेस विजयी -सलग चार निवडणुकांत औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे विजयी
पहिली लोकसभा (१९५२-१९५७)
- बीड : रामचंद्र गोविंद परांजपे (पीडीएफ)  - औरंगाबाद : सुरेशचंद्र आर्य (काँग्रेस) 
- अंबड : हणमंतराव वैष्णव (काँग्रेस) 
- परभणी : नारायणराव वाघमारे (पीडब्ल्यूपी) - नांदेड : शंकरराव टेळकीकर (काँग्रेस) डॉ. देवराव कांबळे (काँग्रेस) - उस्मानाबाद : राघवेंद्र राव (काँग्रेस)


दुसरी लोकसभा (१९५७-६२)
- औरंगाबाद - स्वा. रामानंद तीर्थ (काँ.) - बीड - रखमाजी  पाटील (काँ.),  - जालना - आर.एन. राव (कॉँ.), ए. व्यंकटराव घारे (पीडब्ल्यूपी), सैफ एफ.बी. तय्यबजी (काँ.) - नांदेड - डॉ. देवराव कांबळे (काँ.), हरिहरराव सोनुले (एससीएफ), - उ.बाद - व्यंकटराव नळदुर्गकर (काँग्रेस), - परभणी - नागोराव पांगरकर, रामराव यादव (काँ.)


तिसरी लोकसभा (१९६२ -१९६७)
- औरंगाबाद : भाऊराव देशमुख (काँग्रेस) - बीड : द्वारकादास मंत्री (काँग्रेस) - रामराव नारायणराव (╫काँग्रेस) - लातूर : तुळशीराम कांबळे - नांदेड : तुळशीदास जाधव (काँग्रेस) - उस्मानाबाद : तुळशीराम पाटील (काँग्रेस) - परभणी : शिवाजीराव देशमुख (काँग्रेस) रामराव यादव (काँग्रेस)


चौथी लोकसभा १९६७– १९७०
- औरंगाबाद : भाऊराव देशमुख (काँग्रेस) -  बीड : नाना रामचंद्र पाटील (कम्युनिस्ट पार्टी) - जालना : व्ही. एन. जाधव (काँग्रेस) - लातूर : तुळशीराम कांबळे (काँग्रेस) - नांदेड : व्यंकटराव तरोडेकर (काँग्रेस) - उस्मानाबाद : तुळशीराम पाटील (काँग्रेस) - परभणी : शिवाजीराव देशमुख (काँग्रेस)


पाचवी लोकसभा  १९७१ – १९७७
- औरंगाबाद : माणिकराव पालोदकर (काँग्रेस) - बीड : सयाजीराव पंडित (काँग्रेस) - जालना : भाऊराव काळे (काँग्रेस) - लातूर : तुळशीराम कांबळे (काँग्रेस) - नांदेड : व्यंकटराव तरोडेकर (काँग्रेस) - उस्मानाबाद : तुळशीराम पाटील (काँग्रेस) - परभणी : शिवाजीराव देशमुख (काँग्रेस). (२५ जून १९७५ ते २१ मार्च ७७ पर्यंत आणीबाणी)


सहावी लोकसभा १९७७-१९७९
- औरंगाबाद : डॉ. बापूसाहेब काळदाते (जनता पार्टी) - बीड : गंगाधरअप्पा बुरांडे (माकप) - हिंगोली : चंद्रकांत पाटील (जनता पार्टी) -  जालना : पुंडलिक दानवे (जनता पार्टी) - लातूर : उद्धवराव पाटील (पीडब्ल्यूपी) - उस्मानाबाद : तुकाराम शृंगारे (काँग्रेस) - परभणी : शेषराव देशमुख (पीडब्ल्यूपी)


सातवी लाेकसभा १९८०–१९८४
- औरंगाबाद : सलीम काझी (काँग्रेस) - बीड : केशरकाकू क्षीरसागर (काँग्रेस) - हिंगोली : उत्तम राठोड (काँग्रेस) - जालना : बाळासाहेब पवार (काँग्रेस) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) -  नांदेड : शंकरराव चव्हाण (काँग्रेस) - उस्मानाबाद : टी. एम. सावंत (काँग्रेस) - परभणी : रामराव यादव (काँग्रेस).


आठवी लोकसभा १९८४-१९८९
- औरंगाबाद : साहेबराव पाटील (काँग्रेस) - बीड : केशरकाकू क्षीरसागर (काँग्रेस) - हिंगोली : उत्तम राठोड (काँग्रेस) - जालना : बाळासाहेब पवार (काँग्रेस) - लातूर : शिवराज पाटील - नांदेड : शंकरराव चव्हाण - अशोक चव्हाण   (काँग्रेस) - उस्मानाबाद : अरविंद कांबळे (काँग्रेस) - परभणी : रामराव यादव (काँग्रेस).


नववी लोकसभा १९९० –१९९१
- औरंगाबाद : मोरेश्वर सावे (अपक्ष) - बीड : बबनराव ढाकणे (जद) - हिंगोली : उत्तम राठोड (काँग्रेस) - जालना : पुंडलिक दानवे (भाजप) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) - नांदेड : डॉ. व्यंकटेश काब्दे (जद) - उस्मानाबाद : अरविंद कांबळे (काँग्रेस) - परभणी : प्रा. अशोकराव देशमुख (शिवसेना).


दहावी लोकसभा १९९१ – १९९६
- औरंगाबाद : मोरेश्वर सावे (शिवसेना) - बीड : केशरकाकू क्षीरसागर (काँग्रेस) - हिंगोली : विलासराव गुंडेवार (शिवसेना) - जालना : अंकुश टोपे (काँग्रेस) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) - नांदेड : सूर्यकांता पाटील (काँग्रेस) - उस्मानाबाद : अरविंद कांबळे (काँग्रेस) - परभणी : प्रा. अशोकराव देशमुख (शिवसेना).


अकरावी लोकसभा  १९९६–१९९७
- औरंगाबाद : प्रदीप जैस्वाल (शिवसेना) - बीड : रजनी अशोक पाटील (भाजप) - हिंगोली : शिवाजी माने (शिवसेना) - जालना : उत्तमसिंग पवार (भाजप) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) - नांदेड : गंगाधर कुंटूरकर (काँग्रेस) - उस्मानाबाद : शिवाजी कांबळे (शिवसेना) -  परभणी : सुरेश जाधव (शिवसेना),


बारावी लाेकसभा १९९८ – १९९९
- औरंगाबाद : रामकृष्णबाबा पाटील (काँग्रेस) -  बीड : जयसिंगराव गायकवाड पाटील (भाजप) - हिंगोली : सूर्यकांता पाटील (काँग्रेस) - जालना : उत्तमसिंग पवार (भाजप) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) - नांदेड : भास्करराव पाटील (काँग्रेस) - उस्मानाबाद : अरविंद कांबळे (काँग्रेस) - परभणी : सुरेश वरपुडकर (काँग्रेस).


तेरावी लोकसभा १९९९–२००४
- औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) - बीड : जयसिंगराव गायकवाड पाटील - हिंगोली : शिवाजी माने (शिवसेना) - जालना : रावसाहेब दानवे (भाजप) - लातूर : शिवराज पाटील (काँग्रेस) - नांदेड : भास्करराव पाटील खतगावकर (काँग्रेस) - उस्मानाबाद : शिवाजी कांबळे (शिवसेना) - परभणी : सुरेश जाधव (शिवसेना).


चौदावी लोकसभा २००४ – २००९
- औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) - बीड : जयसिंगराव गायकवाड पाटील (काँग्रेस) - हिंगोली : सूर्यकांता पाटील (काँग्रेस) - जालना : रावसाहेब दानवे (भाजप) - लातूर : रूपाताई निलंगेकर (भाजप) - नांदेड : दिगंबर पाटील (भाजप) - उस्मानाबाद : कल्पना नरहिरे ╞(शिवसेना) - परभणी : तुकाराम रेंगे पाटील (शिवसेना).


पंधरावी लोकसभा २००९-२०१४
- औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) - बीड : गोपीनाथ मुंडे (भाजप) - हिंगोली : सुभाष वानखेडे (शिवसेना) - जालना : रावसाहेब दानवे (भाजप) - लातूर : जयवंत आवळे (काँग्रेस) - नांदेड : भास्करराव खतगावकर (काँग्रेस) - उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) - परभणी : गणेशराव दुधगावकर (शिवसेना).


सोळावी लोकसभा २०१४ -२०१९
- औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) - बीड : डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) - हिंगोली : राजीव सातव (काँग्रेस) - परभणी : संजय जाधव (शिवसेना) - जालना : रावसाहेब दानवे (भाजप) - लातूर : डॉ. सुनील गायकवाड (भाजप) - नांदेड : अशोकराव चव्हाण (काँग्रेस) - उस्मानाबाद : प्रा. रवींद्र गायकवाड (शिवसेना).


शिवराज पाटलांची विजयाची हॅट््ट्रिक
लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा १९८० मध्ये निवडून आल्यानंतर शिवराज पाटील यांनी पुढील सहाही निवडणुका जिंकल्या. त्यांचा विजयी रथ भाजपच्या रूपाताई निलंगेकरांनीच रोखला.


उस्मानाबादेत काँग्रेसला कांबळेंनी रोखले
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्या  ते दहाव्या लाेकसभेपर्यंत काँग्रेसच विजयी होत होती. मात्र १९९६ च्या निवडणुकीत शिवाजी कांबळेंनी काँग्रेसला रोखले. 

बातम्या आणखी आहेत...