आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा प्रांतात सर्वाधिक न्यायप्रविष्ट खटले शिवसेनेच्या खासदारांवरच 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवड्यातील आठही खासदारांत सर्वाधिक पोलिस केसेस व न्यायप्रविष्ट खटले हे शिवसेनेच्या खासदारांवर असून यात उस्मानाबादचे खासदार  रवींद्र गायकवाड १८ खटल्यांसह सर्वात आघाडीवर आहेत. त्या पाठोपाठ परभणीचे खासदार बंडू जाधव १५ तर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे ८ खटल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे. उमेदवारावर कोणते खटले दाखल आहेत, कोेणते न्यायप्रविष्ट आहेत, कोणत्या खटल्यात दोन वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली आहे काय? याची माहिती शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. यात मराठवाड्यातील उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला असता ही आकडेवारी पुढे आली.


रास्ता रोकोचे खटले सर्वाधिक : शिवसेनेच्या सर्वच खासदारांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत यात ९९ टक्के विना परवानगी रास्ता रोको, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, घोषणाबाजी करणे अशाच स्वरूपाचे खटले आहेत. मात्र हे सर्व खटले प्रलंबित असून कोणत्याही खासदाराला शिक्षा झालेली नसल्याचे शपथपत्रांत नमूद आहे.


अशोकराव चव्हाण यांच्यावर सीबीआयचे खटले  : नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर एकूण सात खटले सुरू आहेत. यात सीबीआयच्या विशेष न्यायालयात एक खटला तर दुसरा खटला आदर्श हाउसिंग सोसायटी प्रकरणी मुंबईत सुरू असल्याची नोंद आहे. बाकीचे खटले यवतमाळ येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असल्याचे दाखवले आहे.


महिला खासदारांत भावना गवळी आघाडीवर 
राज्यात ४८ पैकी सहा महिला खासदार आहेत. यात सुप्रिया सुळे, (राष्ट्रवादी काँग्रेस), बारामती, प्रीतम मुंडे (भाजप) बीड, पूनम महाजन (भाजप), उत्तर मुंबई, डॉ हिना गावित (भाजप), नंदुरबार  रक्षा खडसे (भाजप), रावेर, भावना गवळी (शिवसेना) वाशीम या महिला खासदारांनी   २०१४ च्या निवडणुकीचा अर्ज भरताना  प्रलंबित खटले अथवा गुन्हे दाखल झाल्याचा रकाना निरंक भरला आहे. मात्र वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर एकूण सहा खटले दाखल झाले. पैकी चार खटले प्रलंबित असून दोन खटल्यांतून त्या निर्दोष मुक्त झाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. (स्रोत २०१४ मधील अर्ज)

बातम्या आणखी आहेत...