आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Marathwada Watergrid On The New Government's Radar, 'According To Experts, The Project Is Technically Inappropriate; So Let's Check It Out ': Ajit Pawar

मराठवाडा वॉटरग्रीड नवीन सरकारच्या रडारवर, 'तज्ज्ञांनुसार, प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य; म्हणून तो नव्याने तपासू' : अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी युती सरकारने सुरू केलेला मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प नव्या महाविकास आघाडी सरकारच्या रडारवर असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. हा संपूर्ण प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा प्रकल्प नव्याने तपासला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधी राखीव नसेल. मग हा प्रकल्प रद्द झाला का? या प्रश्नावर मात्र पवार यांनी उत्तर दिले नाही. प्रकल्प याेग्य असल्याचा अहवाल आला तर पुरवणी बजेटमध्ये पैशाची तरतूद केली जाईल, असे पवार म्हणाले. तज्ज्ञांकडून हा प्रकल्प तपासला जाईल, नंतर निधीची तरतूद केली जाईल, अशी हमी पवार यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाशिकमध्ये बोलताना महत्त्वाकांक्षी वाॅटरग्रीड याेजनेत बदल करण्याचे संकेत दिले.

असा आहे वॉटरग्रीड प्रकल्प

मराठवाड्यातील ज्या प्रकल्पात पुरेसे पाणी असते तेथून उचलून जेथे पाणी नाही अशा भागांत ते पाइपलाइनने पोहोचवणे, अशी ही योजना आहे. प्रसंगी कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी पंप करून मराठवाड्यात आणायचे, अशी ही योजना होती. यावर हजारो कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
 

बातम्या आणखी आहेत...