आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathwada's Girl Smita Kabra Has Achieved Success In Bollywood, Now She Is Working As A Songwriter

मराठवाड्याच्या तरुणीने मायानगरीत मिळवले यश, गीतकार म्हणून नावारूपास येत आहे स्मिता काबरा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रतिभा आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या शहरातून थेट मायानगरी मुुंबईपर्यंत मराठवाड्याच्या तरुणीने मजल मारली आहे. ती बॉलीवूडमध्ये गीतकार म्हणून नावारूपास येत आहे. 'वन डे जस्टिस डिलिवर्ड' या चित्रपटासाठी तिने एक गाणे लिहिले आहे. '... खुदा का नूर है तुझमें, एक बात तो जरुर है तुझमें..' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे सुनिधी चौहान आणि विक्रांत यांनी गायले आहे. 

 

स्मिता राठी-काबरा असे तिचे नाव असून ती मूळ हिंगोलीची आहे. तिचे माध्यमिक शिक्षण हिंगोलीत, तर उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादेत झाले आहे. 'वन डे जस्टिस डिलिवर्ड' हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या गाण्याला चांगली पसंती मिळत अाहे. हे गाणे अनुस्मृती सरकार आणि कश्यप बारभय्या यांच्यावर चित्रित केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक नंदा यांना हे गाणे आवडले आणि त्यांनीच स्मिताला चित्रपटात गीतकार म्हणून संधी दिली. विक्रांत पारिजात यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 

 

तीन वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला ब्रेक... 
स्मिताला हे यश एकदमच मिळाले नाही, तर तीन वर्षांच्या संघर्षानंतर तिला या चित्रपटात गीतकार म्हणून ब्रेक मिळाला आहे. लग्नानंतर पतीची मुंबईत बदली झाली. त्यानंतर ती अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना भेटली. यासाठी तिला तीन वर्षे संघर्ष करावा लागला. मात्र आपल्या प्रतिभेवर मला विश्वास होता, माझ्या गीतांना नक्कीच पसंती मिळेल याची माहिती होती, असे ती म्हणते. आपल्यामधील प्रतिभेवर विश्वास ठेवत संयमाने काम केले तर यश नक्कीच मिळते असे स्मिता म्हणते. 

 

लहानपणापसून लेखनाची आवड...  
स्मिताला लहानपणापासूनच गीत-कविता लिहिण्याची आवड होती. तिने महाविद्यालयीन जीवनात आणि लग्नानंतरही ती आवड जपली. लग्नानंतर पती रितेश काबरा यांनी तिला प्रोत्साहन दिले. पतीचा पांठिबा आणि सहकार्यामुळेच आज बॉलीवूडमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे ती सांगते. आज पतीच्या योगदानामुळे इथवर येऊ शकल्याचे स्मिता सांगते. स्मिताने संगीतातही विशारद मिळवली आहे.