दुर्लभ संयोग / 25 मार्चपासून नववर्ष; 178 वर्षांपूर्वी गुरूने केला होता मकर राशीमध्ये प्रवेश, 2020 मध्येही असेच होईल

मकर राशीत जुळून येईल मंगळ, गुरु आणि शनीचा योग

रिलिजन डेस्क

Mar 14,2020 12:05:00 AM IST

बुधवार, 25 मार्च 2020 पासून चैत्र नवरात्री सुरु होत आहे. या दिवशी कलश स्थापना करून हिंदू नववर्षाची सुरुवात होईल. याच तिथीला गुढीपाडवा सण साजरा केला जाईल. या नवरात्रीमध्ये विशेष संयोग जुळून येत आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नवरात्र काळात गुरु स्वराशी धनूमधून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. मकर गुरुची नीच राशी आहे. याचा अर्थ नवरात्रीच्या मध्यात गुरु नीचेचा होईल. चैत्र नवरात्री 2 एप्रिलपर्यंत राहील.


178 वर्षांनंतर जुळून आला होता असाच दुर्लभ योग

पं. शर्मा यांच्यानुसार 11 एप्रिल 1842 पासून चैत्र मासातील नवरात्रीची सुरुवात झाली होती. या नवरात्रीमध्ये 16 एप्रिलला गुरु ग्रहाने धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी 2020 मध्येही असाच योग जुळून येत आहे. 25 मार्चपासून नवरात्री सुरु होईल आणि 29 मार्चला गुरु राशी बदलून मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीमध्ये मंगळ, गुरु आणि शनीचा योग जुळून येईल.


विक्रम संवत् 2077 सुरु होईल

25 तारखेपासून हिंदू नववर्ष विक्रम संवत् 2077 सुरु होईल. याचे नाव प्रमादी आहे. नवरात्री बुधवारपासून सुरु होऊन गुरुवार 2 एप्रिलपर्यंत राहील. प्रमादी संवत् चे राजा बुध आणि मंत्री चंद्र आहेत. बुध आणि चंद्र शत्रू ग्रह मानले जातात. अशा परिस्थितीमध्ये मंत्री आणि राजामध्ये मतभेद असल्यास प्रजेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


कसे राहील नवीनवर्ष

पं. शर्मा यांच्यानुसार नववर्षात शेतीवर नकारात्मक प्रभाव, अल्प वर्षा आणि जनतेला जास्त कर द्यावा लागू शकतो. भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, इराण, चीन, बांगलादेश, म्यानमारसाठी नवीन वर्ष अडचणींनी भरले राहू शकते. या भागात भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. महागाई, तणाव, वादाची स्थिती जास्त राहू शकते.

X