आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रवात स्थितीमुळे 28 ते 30 मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - राज्यात २८ ते ३० मार्च या काळात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा चाळिशी पार पोहोचला आहे. बुधवारी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.  


पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भात या काळात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ दिसून आली. बुधवारी विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या, तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या  जिल्ह्यांत तापमान ४० अंशांवर राहिले.  या परिस्थितीत मध्य महाराष्ट्र व आसपासच्या परिसरात चक्रवात स्थिती निर्माण झाल्याने २८ ते ३० मार्च या काळात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...