आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Mardani 2' Succeeds In Winning The Hearts Of Audiences : Said Actress Rani Mukharjee

प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला 'मर्दानी-2' : राणी मुखर्जी, चित्रपटाने आतपर्यंत केली 40 कोटी 20 लाखांची कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'दबंग 3'चे प्रदर्शन आणि सीएएच्या विरोधानंतरही राणी मुखर्जी अभिनीत 'मर्दानी-2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले. या चित्रपटाने आतापर्यंत ४०.२० कोटींची कमाई केली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी-2' चित्रपटाने आठवड्याभरातच चांगली कमाई केली आहे. बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटाला मिळालेले यश पाहून राणी खुश झाली. याविषयी तिच्याशी संपर्क साधला असता राणी म्हणाली, या चित्रपटाला यश मिळाले कारण आमच्या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांशी जोडलेली आहे. लोकांना ती कथा आवडली. कारण या कथेतून आम्ही समाजातील सत्य लोकासमोर आणले आहे. आपल्या समाजातील स्त्रियांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, तेच आम्ही दाखवले. ते महिलांना आणि पुरुषांनाही पटले. आपण सर्वजण वर्तमानपत्रांतून या समस्या वाचत असतो. त्या पडद्यावर आणल्या पाहिजेत. कारण पात्राची प्रतिमा लोकांच्या मनावर बरीच दिवस टिकून राहते. ही कथा गोपीने लिहिली होती. पटकथा वाचतानाच मला ती आवडली होती.