Home | Sports | Other Sports | maria sharapova in fourth round french open

चँगला नमवून शारापोव्हा फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत

Agency | Update - May 30, 2011, 05:54 PM IST

माजी अव्वल मानांकित मारिया शारापोव्हाने महिला एकेरीत 6-2, 6-3 गुणांनी तैवानची टेनिसपटू चँग यांगवर विजय संपादन करून फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली.

  • maria sharapova in fourth round french open

    पॅरिस - माजी अव्वल मानांकित मारिया शारापोव्हाने महिला एकेरीत 6-2, 6-3 गुणांनी तैवानची टेनिसपटू चँग यांगवर विजय संपादन करून फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली.

    सलामीपासून दमदार खेळीच्या बळावर विजयी मोहिमेवर असलेल्या मारिया शारापोव्हाची लढत चँग यांगसोबत झाली. स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या शारापोव्हाने आक्रमक खेळी करून पहिल्या सेटवर 6-2 गुणांनी बाजी मारली. याच आघाडीच्या आव्हानाला राखून ठेवण्यासाठी कोर्टवर ताबा मिळवून शारापोव्हाने शानदार 6-3 गुणांच्या आघाडीने विजय संपादन केला.

Trending