Home | Sports | Other Sports | Marine won in 31 minutes

सायनाचे अाव्हान संपुष्टात; मरीन ३१ मिनिटांत विजयी

दिव्य मराठी | Update - Aug 04, 2018, 08:12 AM IST

माजी नंबर वन सायना नेहवालला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली नाही. यासाठीचा तिचा प्रयत्न अपुरा ठरला.

 • Marine won in 31 minutes

  नानजिंग- माजी नंबर वन सायना नेहवालला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली नाही. यासाठीचा तिचा प्रयत्न अपुरा ठरला. यामुळे तिचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. याशिवाय भारताच्या स्वस्तिकराज अाणि अश्विनी पाेनप्पालाही स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. या जाेडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे सायनाचे पुढच्या फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. अव्वल मानांकित झांग अाणि हुयांगने मिश्र दुहेरीच्या लढतीत भारताच्या स्वस्तिकराज अाणि अश्विनीला पराभूत केले. त्यांनी ३७ मिनिटांत २१-१७, २१-१० ने सामना जिंकला.


  मरीनचा एकतर्फी विजय निश्चित
  रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन कॅराेलिना मरीनने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सहज विजयाची नाेंद केली. तिने सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी सायनाला सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. तिने ३१ मिनिटांत २१-६, २१-११ अशा फरकाने हा सामना जिंकला.


  मरीनची विजयी अाघाडी
  स्पेनच्या मरीनचा अाॅल अाेव्हरमधील सायनाविरुद्धचा हा पाचवा विजय ठरला. यातून तिने या रेकाॅर्डमध्ये अाघाडी घेतली. अातापर्यंत ९ लढतीत या दाेघींची झुंज रंगली. यात मरीनने पाच विजय संपादन केले. सायना चार सामन्यांंत विजयाची मानकरी ठरली.

Trending