आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मरजावां' ची रिलीज डेट बदलली, आता 22 नोव्हेंबरला आयुष्मान खुरानाच्या 'बाला'सोबत होईल टक्कर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख स्टारर चित्रपट 'मरजावां' या वर्षी २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता. नंतर जेव्हा याच दिवशी हृतिक आणि टायगरचा वार रिलीज होण्याची घोषणा झाली तेव्हा मरजावांच्या निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख बदलून २२ नोव्हेंबर करण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील निर्मात्यांना सोलो रिलीज डेट नाही मिळाली. कारण याच दिवशी आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर स्टारर 'बाला' रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाची तारीख आणखी बदलते की याच दिवशी दोन्ही रिलीज होतात, पाहण्याजोगे ठरेल.