आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mark Zuckerberg Facebook Twitter Messenger, Instagram Account Hacked News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक, 'फेसबुक सुद्धा हॅक केले जाऊ शकते' कॅप्शनसह फोटो केला पोस्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट शनिवारी हॅक झाले. ट्विटरने स्वतः विधान जारी करत याबाबत माहिती दिली. यामध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून फेसबुकचे अधिकृत अकाउंटला निशाणा बनवण्यात आल्याचे सांगितले. या हॅकिंगमागे 'अवरमाइन ग्रुप' नावाची सायबर गुन्हेगारी संघटनाचा हात असल्याचे सांगितले जात आहे. या संघटनेने यापूर्वीही गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग आणि ट्विटर प्रमुख जॅक डोर्सी यांचा अकाउंट केले आहेत. 
हॅकर्सनी इन्स्टाग्रामवर देखील अशाचप्रकारे फेसबुकचे अकाउंट हॅक केले आणि त्यावर ग्रुपचा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये लिहिले की, "आम्ही अवरमाइन ग्रुपचे आहोत. फेसबुक सुद्धा हॅक केले जाऊ शकते. मात्र त्यांची सिक्योरिटी ट्विटरपेक्षा चांगली आहे."
दरम्यान फेसबुकचे अकाउंट कोणत्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून हॅक केले याबाबत ट्विटरने कोणताही खुलासा केला नाही. खोरोस सोशल मीडिया मॅनेजमेंट टूलद्वारे अकाउंट हॅक केल्याचे बोलले जात आहे. डिजिटल मार्केटिंग आणि पीआर कंपन्या आपले सोशल मीडिया अकाउंट्सला मॅनेज करण्यासाठी खोरोजचा वापर करतात. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, त्यांना याप्रकरणाबाबत जेव्हा समजले, तेव्हा त्यांनी लगेच अकाउंट लॉक केले. सध्या फेसबुक आणि ट्विटर अशाप्रकारच्या अडचणी निस्तारण्यासाठी एकत्र काम करत आहेत. अवर माइन ग्रुप सौदीच्या युवकांची संघटना


अवरमाइन ग्रुपने नुकतेच नॅशनल फुटबॉल लीगशी संबंधित 12 हून अधित संघांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. हा ग्रुप 2016 पासून सक्रिय आहे आणि यामागे सौदी अरेबियातील युवकांचा हात असल्याचे मानले जात आहे. फेसबुकने देखील या घटनेनंतर सांगितले की, आमचे कॉरपोरेट सोशल अकाउंट काही वेळासाठी हॅक झाले होते, मात्र आता त्यांनी सुरक्षित करण्यात आले आहे.