Business Special / माजी सुरक्षा अधिकाऱ्याचा झुकरबर्गला सल्ला, फेसबुकच्या सीईओ पदासाठी करावी ब्रेड स्मिथची निवड

फेसबुकचे को-फाउंडर क्रिस ह्रयूज म्हटले होते की, फेसबुकला तोडून वेगवेगळ्या कंपन्या बनवल्या पाहिजे

दिव्य मराठी वेब टीम

May 22,2019 04:33:00 PM IST

टोरंटो(कॅनडा)- फेसबुकचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी अॅलेक्स स्टेमॉस यांनी मार्क झुकरबर्गने आपले अधिकार कमी करून फेसबुकसाठी नवीन सीईओची नियुक्ती करावी, असे मत व्यक्त केले आहे. स्टेमॉस म्हणाले की, झुकरबर्गच्या ठिकाणी मी असलो तर असेच केले असते. स्टेमॉसनुसार, फेसबुकच्या सीईओ पदासाठी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रेड स्मिथ योग्य व्यक्ती आहेत.

झुकरबर्गने घेतला स्मिथकडून सल्ला रिपोर्ट
स्मिथ 1993 पासून मायक्रोसॉफ्टसोबत आहेत. 2002 मध्ये ते कंपनीचे मुख्य कायदेशीर सल्लागार बनले. मिळालेल्या माहितीनुसार, कँब्रिज अॅनालिटिका वादादरम्यान झुकरबर्गने स्मिथ यांचा सल्ला घेतला होता. स्टेमॉस म्हणाले की, झुकरबर्ग यांच्याकडे खूप जास्त अधिकार आहेत, त्यांनी आपले अधिकार कमी केले पाहिजे. तसेच, फेसबुकला उत्पादनबाबतीत अंतरिक क्रांती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे झुकरबर्ग यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे.


स्टेमॉसच्या माहितीनुसार, झुकरबर्ग सध्या फेसबुकच्या मुख्य उत्पादनाची जबाबदारी संभाळत आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिस्टोफर कॉक्सने राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे झुकरबर्ग या पदाची जबाबदारीही संभाळत आहेत. माझ्या मते, त्यांनी तेच काम करायला पाहिजे ज्यामध्ये त्यांना रस असेल.

समाजावर फेसबुकचा खूप मोठा प्रभाव असल्यामुळे कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी फेसबुकचे को-फाउंडर क्रिस ह्रयूज म्हटले होते की, फेसबुकला तोडून वेगवेगळ्या कंपन्या बनवल्या पाहिजे.

X
COMMENT