आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅलिफोर्निया : फेसबुकचे संस्थापक- सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले, माझ्या कुटुंब -मित्रांना वेळ द्यायचा आहे. पण झुकेरबर्ग म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून. ही गाेष्ट प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. इंटरनेटने आपल्या सीमा, संस्कृती आणि संधींचा विस्तार झाला. इतक्या माेठ्या समुदायाचा एक भाग हाेणे आव्हानात्मक आहे. नातेसंबंधांतील जिव्हाळाच कमी झाला आहे. ५.९१ लाख काेटी रुपयांची संपत्ती असलेल्या झुकेरबर्ग यांनी वार्षिक ब्लाॅगमध्ये ही गाेष्ट सांगितली. सादर आहे काही अंश...
येणाऱ्या पाच वर्षांत आमच्या खासगी गप्पांना पुन्हा जाेर येणार
सर्वांना आपली स्वत:ची जागा हवी आहे, जेणेकरून स्वतःला वेळ देऊ शकू. या काळात आपले व्यक्तिमत्त्व काय आहे याची चिंता करू नये. तथापि, मला याची खूप गरज आहे, कारण माझे आयुष्य खूप सार्वजनिक झाले आहे. जेव्हा मी एका लहान गावात मोठा होतो तेव्हा स्वत:ला वेळ देणे व त्याची जाणीव हाेणे साेपे हाेते. परंतु कोट्यवधी लोकांमध्ये आपली स्वतंत्र भूमिका शोधणे कठीण आहे. या दशकात काही अतिशय महत्त्वाच्या सामाजिक संरचना पुन्हा आत्मीयतेची जाणीव करून देण्यासाठी आम्हाला मदत करतील. त्यासाठीच्या नावीन्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. पुढील पाच वर्षांत आमचे डिजिटल - सामाजिक वातावरण खूप वेगळे असेल पुन्हा खासगी गप्पांवरचा जाेर वाढेल. त्यातून लहान लहान समुदाय तयार करण्यासाठी मदत मिळेल, ज्याची आपल्या सर्वांनाच गरज आहे. या दशकात दरवर्षीच्या आव्हानांपेक्षा दीर्घ कालावधीवर जास्त लक्ष केंद्रित करेन. माझ्या जगाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. २०३० मध्ये माझे जीवन कसे असेल ? ताेपर्यंत माझी मुलगी मॅक्स शाळेत शिकत असेल. आमच्याकडे असे तंत्रज्ञान असेल की, एखादी व्यक्ती दूर असतानाही ती प्रत्यक्ष उपस्थित असल्याची जाणीव करता येईल. वैज्ञानिक संशाेधन अनेक आजारांपासून वाचण्यासाठी व त्यांच्या उपचारासाठी मदतनीस सिद्ध हाेती. त्यामुळे आपले आयुष्य अडीच वर्षांनी वाढेल. माझ्या दृष्टीने फेसबुक तरुणांची कंपनी आहे, जी नव्या पिढीच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. आम्ही आगामी एका दशकात तरुण उद्याेजक, संशाेधक, विशेषज्ञांना जास्त संधी आणि फंडिंग देण्यावर लक्ष केंद्रित करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.