आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक पोलिसांसोबत वाद झाल्याने कार चालकाला आला हृदयविकाराचा जोरदार झटका, जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोएडात येथे ट्रॅफिक पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर रविवारी आली आहे. नोएडातील एका सॉफ्टवेअर कंपनी मार्केटिंग अधिकारी असलेली ही व्यक्ती आपल्या कारने जात होती. त्याचवेळी अचानक एक ट्रॅफिक पोलिस कारसमोर आला आणि कारवर काठी मारून थांबण्याची धमकी दिली. ती व्यक्ती कार सोडून बाहेर उतरली आणि कुठलीही चूक नसताना पोलिसाच्या या वर्तनाचा जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. हृदयविकाराच्या झटक्याने ती व्यक्ती जागीच कोसळली आणि संबंधित पोलिस कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाला.

पीडित युवकाचे नाव गौरव (34) असून तो सॉफ्टवेअर कंपनीतील मार्केटिंग विभागात अधिकारी होता. त्याचे कुटुंबीय नोएडा सेक्टर-52 येथील शताब्दी विहारमध्ये राहत होते. वडील मूलचंद शर्मा निवृत्त अधिकारी आहेत. गौरव आपल्या आई-वडिलांसोबत रविवारी संध्याकाळी कारने एका नातेवाइकाकेड जात होता. त्याचवेळी ही घटना घडली. आपला मुलगा खाली कोसळल्याचे पाहताच आई-वडील कारमधून उतरले आणि आपल्या मुलाला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आता या वयोवृद्ध दांपत्याने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...