आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी लग्न मोडले, आता शिकलेला मुलगा मिळेना, शिक्षणासाठी लहान वयात काडीमोड पदरी आला तरी ती डगमगली नाही...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मिनाज लाटकर

औरंगाबाद - जोतिबांशी लग्न झाले म्हणून सावित्रींनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पण राजस्थानातील नसीमला शिक्षणासाठी स्वत:चे लग्न मोडावे लागले. घुंघट प्रथा आजही कडक असलेल्या राजस्थानातील अजयसर गावात ती राहाते. आठवीत असतानाच तिचे लग्न लावून दिले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला गावातील पंचायतीसमोर विवाहाचा काडीमोड करावा लागला. घटस्फोटासाठी कोर्टात धाव घ्यावी लागली, पण तिने माघार घेतली नाही. जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, बाइक शिकली. आज घुंघट न जुमानता पंजाबी ड्रेस घालणारी, बाइक चालवणारी आणि पदवीपर्यंत पोहोचलेली ती गावातली पहिली मुलगी ठरली आहे.साडेतीन हजार लोकवस्तीच्या अजयसर गावात सगळ्यांचे बालविवाह झालेत. गावातील प्रत्येक बाई घुंघटात वावरते आणि फक्त एकटी नसीमच बाइकवरून फिरते. कोर्टात जाऊन घटस्फोट घेणे असो, पदवी परीक्षेचा अभ्यास असो वा घुंघट न घेता बाइकवरून फिरणे असो, असंख्य टक्केटोमणे आणि शेरेबाजीचा तिला सामना करावा लागतो. पण ती आपल्या निश्चयापासून ढळली नाही. तिने समाजशास्त्रात बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आता पोलिस अधिकारी होण्याची तयारी करते आहे.पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न
 
> आजही गावातील सर्वांचे होतात बालविवाह
> शिक्षणासाठी घटस्फोटापर्यंत घ्यावी लागली धाव
> घुंघट प्रथा तीव्र, त्यामुळे बाइकही निषिद्ध
> एम.ए. करून पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्नकुटुंबाचा पाठिंबा हवाच

> कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हेे झालं शक्य
> ध्येय निश्चित होतंं, त्यामुळे दिला लढा
> पंचक्रोशीतील मुलींसाठी ठरतेय प्रेरणा
> टोमण्यांकडे दुर्लक्ष करून लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला