लग्नापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल ...

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 06:31 PM IST

लग्न ही मानवी आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्नानंतर वधू वरांचे जीवन सुखी आणि आनंदी व्हावे, अशाी सगळ्यांचीच इच्छा असते.

  • marriage-kundali

    लग्न ही मानवी आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्नानंतर वधू वरांचे जीवन सुखी आणि आनंदी व्हावे, अशाी सगळ्यांचीच इच्छा असते. म्हणूनच विवाहापूर्वी विवाहेच्छुक मुलामुलींचे गुण मिळविले जातात. ज्योतिष जाणकाराकडून भावी पती पत्नींचे गुण दोष मिळविण्यात येतात. गुण मिळवताना वधु वरांचे छत्तीस गुण असतात. हे गुण क्रमश वर्ण, वश्य, तारा, योनी, गृहमैत्री, गण, भृकुट, नाडी याप्रमाणे आहेत.    36 गुणांपैकी सर्वाधिक 8 गुण नाडीसाठी असतात. आद्य, मध्य आणि अंत्य या तीन नाड्या असतात. या नाड्यांचा संबंध माणसाच्या शारीरिक धातूंशी असतो. वधु वरांची नाडी समान असणे दोषपूर्ण मानले जाते. हा दोष अपत्यप्राप्तीसाठी हानीकारक आहे. समान नाडी असतील तर परस्पर विकर्षण आणि असमान नाडी असतील तर आकर्षण असते.    ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की समान रक्तगट असणा:या जोडप्यांना मूल होताना अडचणी येऊ शकतात. कर्मकांडांमध्येदेखील नाडीदोष असणारे विवाह त्याज्य मानले गेले आहेत.Trending