आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, प्रेम-प्रसंग अन् लग्नाविषयी सांगते ही रेषा, पाहा तुमच्याविषयी काय सांगते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात.

 

आपल्या हातावरील छोट्या छोट्या रेषांमध्ये सतत काहीतरी बदल होत असतात.परंतू काही विशिष्ट रेषांमध्ये कोणतेच बदल घडत नाहीत. यामध्ये आयुष्य रेषा, भाग्य रेषा, हृदय रेषा, मणिबंध, सूर्य रेषा आणि विवाह रेषा यांचा सामावेश आहे.

 

कुठे असते विवाह रेषा -
विवाह रेषा लिटिल फिंगर (करंगळी) च्या खालच्या बाजूला असते. काही लोकांच्या हातावर एक विवाह रेषा असते तर, काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त. करंगळीच्या खाली असलेल्या भागाला बुध पर्वत असे म्हणतात. तेथे असलेल्या रेषांना विवाह रेषा म्हणतात.


1- हातावर एकापेक्षा जास्त विवाह रेषा प्रेम संबंधाच्या संख्येकडे इशारा करतात. तसेच ही रेषा तुमचे वैवाहिक जीवन कसे राहील हेही सांगते. रेषा जर खालील बाजूस जास्त झुकलेल्या असतील तर वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


2-जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही हातावर विवाह रेषेचा सुरुवातीलाच दोन शाखा असतील तर त्या व्यक्तीचे लग्न मोडण्याची भीती राहते.


3-जर एखाद्या स्त्रीच्या हातावारिक विवाह रेषेच्या सुरुवातीला द्वीपचे चिन्ह असेल तर लग्न धोक्याने होण्याची शक्यता असते. तसेच हे चिन्ह जोडीदाराच्या खराब आरोग्याकडे इशारा करते.

 

पुढे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी... 

 

बातम्या आणखी आहेत...