बंगळुरू / व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधून घोडा-घोडीचे लग्न लावण्यात आले; बंगळुरूमधील कुब्बन पार्कमध्ये झाला विवाह सोहळा

  • मागच्या वर्षी दोन बकऱ्यांचे  लग्न लावले होते

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2020 02:01:00 PM IST

बंगळुरू- कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील कुब्बन पार्कमध्ये काल व्हॅलेंटाइन डे चे औचित्या साधून घोडा (राजा) आणि घोडी (रानी)चे पारंपरिक पद्धतीने लग्न लावण्यात आले. यादरम्यान घोड्याला आहेर म्हणून धोती आणि शर्ट देण्यात आला, तर घोडीला साडी आणि मंगळसूत्र घालण्यात आले.


लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना मिठाई आणि जेवण देण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 लाख आणि राज्य सरकारकडून 50 हजार रुपये दान देण्याचाही आग्रह करण्यात आला होता. ही मागणी पूर्ण झाली नाही, पण या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच, यूजर्स मेजेशीर कमेंट्स करत आहेत.


या व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोवर एका यूजरने लिहीले, ‘‘हॅप्पी मॅरिड लाइफ.’’ दुसऱ्याने कमेंट केली- ‘‘यांचे आयुष्य का खराब केले. लग्नाआधी किती खूश होते ते.’’


मागच्या वर्षी बकऱ्यांचे लग्न लावले होते


हे लग्न सामाजिक कार्यकर्ते आणि कन्नड वटल पार्टीचे अध्यक्ष वटल नागराज यांनी लावले. त्यांनी मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला दो बकऱ्यांचे लग्न लावले होते.

X