आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांनी लावून दिले 6 वर्षाच्या जुळ्या भाऊ-बहिणीचे लग्न, यामागे लपलेली होती एक शॉकिंग स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंड - येथे सख्ख्या भाऊ बहिणीच्या लग्नाचे आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 6 वर्षांच्या या जुळ्या भाऊ बहिणीचे त्यांच्याच आई वडिलांनी लग्न लावून दिले. त्यामागे सांगितलेले कारण विचित्र आहे. 6 वर्षांच्या गिटार आणि किवी यांचे लग्न लावण्यामागचे कारण म्हणजे, त्यांच्या आई वडिलांचे असे मानने आहे की, ते दोघे गेल्या जन्मात प्रियकर आणि प्रेयसी होते. 


जुळ्यांबाबत अशी मान्यता 
मीडिया रिपोर्ट्सनुसार बुद्धीस्ट लोक असे समजतात की, जुळा मुलगा आणि मुलगी हे त्यांच्या कर्मामुळे एकावेळी जन्माला येतात. एक तर दोघे पूर्वीच्या जन्मातील प्रेमी युगूल असतील किंवा त्या जन्मातील त्यांची इच्छा अपूर्ण राहिली असेल. त्यामुळेच त्यांना एकत्रितपणे पुढच्या जन्मात पाठवले असावे, असे आई वडिलांचे मत असते. अशा भावा बहिणींचे लग्न लावून द्यायला हवे अन्यथा त्यांच्या जीवनात वाईट काळ येतो, अशी मान्यता आहे. 


लग्नात केला रग्गड खर्च 
डेली मेलच्या रिपोर्टनुसार मुलांच्या आई वडिलांनी अत्यंत थाटात हे लग्न लावून दिले. लग्न बुद्धीस्ट पद्धतींनुसार झाले होते. त्यात नातेवाईकांसह मित्रही सहभागी झाले होते. अगदी विधिवत हे लग्न झाले. या लग्नाचा एक व्हिडिओदेखिल व्हायरल झाला होता. त्यात लग्नावर प्रचंड खर्च केल्याचे दिसून आले. 


मुलाने दिला हुंडा 
या लग्नात आणखी एक विचित्र परंपरा पाहायला मिळाली. जुळ्या भावाने लग्नापूर्वी मुलीला 2 लाख बात म्हणजे जवळपास 4 लाख रुपये आणि 1 लाखांचे सोने दिले. त्यानंतरच लग्नाची परवानगी मिळाली. 


जन्मतःच घेतला होता निर्णय 
मुलांचे पिता एम्रोन्सनने म्हटले की, 2012 मध्ये जेव्हा दोघांचा जन्म झाला तेव्हाच हा निर्णय घेतला होता. त्यांना गेल्या जन्मातील कर्ज फेडता यावे यासाठी हे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना पुढचे जीवन व्यवस्थित घालवता येईल. रिपोर्ट्सनुसार या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. मुले मोठी झाल्यानंतर स्वतः पार्टनर निवडू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...