Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Marriage suicide by sending a message to husband, 'I am sorry, I am dying'

‘मला माफ करा मी मरत आहे’ असा मेसेज पतीला मोबाइलवर पाठवून विवाहितेची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - May 23, 2019, 09:33 AM IST

गर्भपातामुळे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज

  • Marriage suicide by sending a message to husband, 'I am sorry, I am dying'

    जळगाव/एरंडोल - दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या २२ वर्षीय विवाहितेचा अचानक गर्भपात झाला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विवाहितेने पतीला मोबाइलवर संदेश पाठवून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी खेडी (ता.एरंडोल) येथे घडली. दरम्यान, विवाहितेस सासरच्या लोकांनी मारहाण करून ठार मारल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.


    खेडी येथील विवाहिता संगीता गणेश कोळी हिचा विवाह दोनवर्षांपूर्वी गणेश कोळी याच्याशी झाला होता. विवाहानंतर संगीता ही गरोदर राहिल्यामुळे कोळी परिवारात आनंदाचे वातवरण होते; मात्र चार दिवसांपूर्वी संगीता हिचा गर्भपात झाला. त्यामुळे संगीता मानसिक दृष्ट्या खचली होती. पती बाहेरगावी असताना मंगळवारी रात्री संगीताने पतीला ‘मला माफ करा मी मरत आहे’ असा मोबाइलवर संदेश पाठवून घरातील विषारी द्रव्य प्राशन केले. यात तिचा मृत्यू झाला.

Trending