आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मला माफ करा मी मरत आहे’ असा मेसेज पतीला मोबाइलवर पाठवून विवाहितेची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव/एरंडोल - दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या २२ वर्षीय विवाहितेचा अचानक गर्भपात झाला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विवाहितेने पतीला मोबाइलवर संदेश पाठवून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी खेडी (ता.एरंडोल) येथे घडली. दरम्यान, विवाहितेस सासरच्या लोकांनी मारहाण करून ठार मारल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.


खेडी येथील विवाहिता संगीता गणेश कोळी हिचा विवाह दोनवर्षांपूर्वी गणेश कोळी याच्याशी झाला होता. विवाहानंतर संगीता ही गरोदर राहिल्यामुळे कोळी परिवारात आनंदाचे वातवरण होते; मात्र चार दिवसांपूर्वी संगीता हिचा गर्भपात झाला. त्यामुळे संगीता मानसिक दृष्ट्या खचली होती. पती बाहेरगावी असताना मंगळवारी रात्री संगीताने पतीला ‘मला माफ करा मी मरत आहे’ असा मोबाइलवर संदेश पाठवून घरातील विषारी द्रव्य प्राशन केले. यात तिचा मृत्यू झाला.