Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | marriage varat firing in ghansavani jalna

नाचण्याच्या नादात मिसफायर; तरुणाच्या पायात घुसली गोळी, घनसावंगी तालुक्यातील घटना

दिव्य मराठी | Update - Mar 11, 2019, 09:04 AM IST

वऱ्हाडी नाचत होते. नाचण्याच्या भरात लक्ष्मण घोलप यांनी शॉर्टगनने हवेत दोन फायर केले.

  • marriage varat firing in ghansavani jalna

    तीर्थपुरी - नवरदेवाचा परण्या निघाला असतांना वरपित्याने हवेत आनंदाच्या भरात शॉर्टगनने दोन वेळा फायर केले. यानंतर नाचत असताना बंदूक जमिनीच्या दिशेने करून उभा राहिला. परंतू, अचानक फायर झाल्याने सुसाट निघालेली गोळी नवरदेवाच्या मित्राच्या पिंढरीत घुसून तो गंभीर जखमी झाला. घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला. दिनेश ईश्वर साळवे (३०) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.


    तळवत बोरगाव येथील सैनिक शिवाजी लक्ष्मण घोलप यांच्या मुलाचा विवाह भोगाव येथील गंगाधर सुदामराव मुळे यांच्या मुलीसोबत रविवारी दुपारी होता. वऱ्हाडी नाचत होते. नाचण्याच्या भरात लक्ष्मण घोलप यांनी शॉर्टगनने हवेत दोन फायर केले. नंतर बंदूक जमीनीकडे धरून उभे असताना अचानक मिसफायर झाले आणि दिनेश ईश्वर साळवे याच्या पायाच्या पिंढरीत गोळी घुसली.

Trending