आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लेकरांचा बाप निघाला प्रियकर, ब्रेक-अप च्या रागात केला GF च्या भावाचा Murder; मृत्यूनंतरही मागायचा खंडणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - 20 वर्षांच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा युवक विवाहित निघाला. एवढेच नव्हे, तर तो दोन मुलांचा बाप होता. प्रेयसीला ही गोष्ट कळाल्यानंतर तिने ब्रेक-अप केला. परंतु, आरोपी यावर इतका संतापला की त्याने प्रेयसीच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून नदीत फेकले. मृत्यू झाल्यानंतरही तो प्रेयसीच्या भावाच्या बदल्यात 2 लाख रुपयांची खंडणी मागत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो आपल्या पत्नीच्या नव्हे, तर दुसऱ्याच एका प्रेयसीच्या घरात लपला होता. 


आरोपीने एकाच दिवशी पाठवले 5 मेसेज
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी अजमल आलमची मोबाइल लोकेशन शोधून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तो बिहारच्या किशनगंज येथील रहिवासी आहे. पीडित मुलाचे वडील कुन्नेलालच्या जबाबानुसार, खटला दाखल करण्यात आला. पोलिसांना आरोपीचा सुगावा त्यानेच पाठवलेल्या मेसेजमधून लागला आहे. 4 ऑगस्ट रोजी आरोपीचा मेसेज आला तेव्हापासूनच पोलिसांनी त्याला ट्रेस करण्यास सुरुवात केली. परंतु, आरोपीने आपला मोबाइल बंद केला. यानंतर आरोपीने एकाच दिवशी खंडणी मागण्यासाठी 5 मेसेज केले. 


हत्या करूनही मागत होता खंडणी
कुन्नेलाल यांना दोन मुले आणि 2 मुली आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी शिकत आहेत. मोठा मुलगा नोकरी करतो आणि मोठी मुलगी घरीच राहते. 27 जुलै रोजी लहान मुलगा शाळेतून परतला आणि बाहेर खेळण्यासाठी निघून गेला. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा अजमल आलमवर पोलिसांना संशय होता. आरोपी अजमल कुन्नेलाल यांच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवू इच्छित होता. त्याचा विवाह आधीच एक दुसऱ्या महिलेशी झाला होता. 


हत्येनंतर दिल्लीत दुसऱ्या गर्लफ्रेंडच्या घरी लपला
> पोलिसांनी सांगितले, की आरोपी 12 वर्षांपूर्वी लुधियानाला आला होता. त्याचे एका स्थानिक 19 वर्षीय तरुणीसोबत संबंध जुळले. त्यानंतर अजमल विवाहित असून त्याला दोन मुली असल्याची माहिती प्रेयसीला मिळाली. तिने अजमलशी संबंध मोडले आणि संपर्क बंद केला. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने प्रेयसीच्या 11 वर्षीय भावाला लक्ष्य केले. 
> आरोपीने दिलेल्या कबुली जबाबनुसार, 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वरिंदर (11) घराबाहेर खेळत होता. त्याला गोड बोलून फिरण्याचे अमिष दाखवले आणि त्याला घेऊन अजमल पसार झाला. यानंतर आंघोळीचा बहाणा करून त्याला सतलज नदीवर नेले. याच ठिकाणी आरोपीने वरिंदरला बुडवून ठार मारल आणि मृतदेह पाण्यात दूर ढकलला. 
> हत्येनंतर त्याने नवीन सिम कार्ड घेऊन दिल्लीच्या एका गर्लफ्रेंडच्या मोबाईलवरून मुलाच्या वडिलांना मेसेज पाठवला. मुलगा हवा असेल तर 2 लाख रुपये खात्यात जमा करा अशी मागणी त्याने केली. दुसरा मेसेज करून मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर आणखी एक मेसेज पाठवला, की एकाचा जीव गेला आता दुसरा मुलगा किंवा मुलीचा जीव जाईल. ही शिक्षा तुम्ही विसरू शकणार नाही. या आणि मुलाचा मृतदेह घेऊन जा. पोलिसांनी त्याला अटक केली असून दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडचा सुद्धा शोध घेतला जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...