आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा सुटताच एखाद्या खास विद्यार्थ्याला घरी घेऊन जायची ही सुंदर शिक्षिका, एक-दोन नव्हे अनेकांनी केली तक्रार; आता झाली ही कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षिकेचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. संगीत विषय शिकवणारी ही शिक्षिका आपल्याच विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करत होती. शाळा सुटताच ती मोजक्या आणि खास मुलांना आपल्या घरी घेऊन जायची. याच ठिकाणी तिने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पालकांनी एकदा तिला रंगेहात पकडले तेव्हा तिचे उत्तर धक्कादायक होते. आपल्याला हे सर्व करण्याची परवानगी शाळेनेच दिली होती असे तिने सांगितले. या घटनेनंतर तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे. तरीही शालेय प्रशासनाला तिच्या कृत्यांची माहिती असताना आधीच कारवाई का केली नाही असा सवाल केला जात आहे.

 

यापूर्वी मिळाल्या अशा तक्रारी
डर्बीशायर येथील एक्सलेस्बोर्न शाळेत शिक्षिका लॉरी सॉफ्टली हिच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. 34 वर्षीय विवाहित शिक्षिकेने मुलांचे शोषण करण्याची ही पहिली वेळ नव्हती. 2008 मध्ये तिने आपल्याच एका 17 वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यावेळी ती 24 वर्षांची होती. त्याने आणि त्याच्या पालकांनी तक्रार केली तेव्हा शालेय प्रशासनाने लॉरीला इशारा देऊन सोडले. यानंतर एका विद्यार्थ्याला पबमध्ये भेटली. त्याला आपल्या कारमध्ये घरी नेऊन त्याचेही लैंगिक शोषण केले. याच घटनेची सुद्धा शाळेला माहिती मिळाली. परंतु, तेव्हा देखील शाळेने तिच्यावर कारवाई न करता लेखी स्वरुपात एक अंतिम इशारा दिला. 2013 मध्ये ती पुन्हा एका विद्यार्थ्यासोबत सेक्स करून चर्चेत आली. यानंतरही शाळेने काहीच केले नाही. परंतु, आता तिच्याविरोधात वाढत्या तक्रारी पाहता तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे.


शाळेबाहेर काय करते याच्याशी आमचा संबंध नाही -शाळा
इतक्या तक्रारी आल्या तरीही शालेय प्रशासनाने तिच्याविरोधात कारवाई करणे सोडून वारंवार फक्त इशारा दिला. तिला नोकरीवरून तेव्हाच काढले असते तर 10 वर्षांत कित्येक मुले सुरक्षित राहिली असती. यात शिक्षिकेपेक्षा शाळेचा अधिक दोष आहे असा आरोप पालकांनी लावला आहे. परंतु, शालेय प्रशासनाने पालकांचे आरोप फेटाळून लावले. तिला यापूर्वी दिलेले इशारे कारवाईचाच भाग होता. आता तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे. सोबतच, ती शाळेत कामाच्या तासांमध्ये काय करते? केवळ याबद्दल आम्ही तिला विचारू शकतो. शाळेबाहेर पडल्यानंतर की कुठे आणि काय करते याच्याशी शाळेचा काहीच संबंध नाही. उलट पोलिसांनीच लोकांच्या तक्रारींचे भांडवल करून शाळेची कुप्रसिद्धी केले असेही शाळेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...