आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला पीरियड्समुळे घरच्यांनी ठरवले अस्पृश्य, कडाक्याच्या थंडीत घराबाहेर झोपण्यास केले मजबूर, सकाळी मायलेकरांचे आढळले मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - नेपाळमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. विवाहितेला पीरियड्स सुरू असल्याने झोपडीत झोपण्यासाठी मजबूर व्हावे लागले होते. तिच्यासेाबत तिची दोन मुलेही होती. झोपडी गरम ठेवण्यासाठी शेकोटी सुरू होती, परंतु धुरामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये पीरियड्स सुरू असताना महिलेला अस्पृश्य मानले जाते आणि तिला या काळात कुटुंबापासून वेगळे राहावे लागते.


झोपडीत झोपायला केले मजबूर
- काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना नेपाळच्या बाजुरा जिल्ह्यातील आहे. येथे अंबा बोबोपा पीरियड्सच्या चौथ्या दिवशी मंगळवारी रात्री आपल्या 9 आणि 12 वर्षांच्या मुलांसोबत झोपडीत झोपण्यासाठी गेली होती. 
- झोपडीत ना खिडकी होती, ना हवा येण्या-जाण्यासाठी काही सुविधा होती. यामुळे जेव्हा अंबाने झोपडी गरम ठेवण्यासाठी शेकोटी पेटवली तेव्हा त्याचा धूर झोपडीत गोळा होऊ लागला. 
- अंबा आणि तिची दोन्ही मुले झोपेत होती, यामुळे धूर साचल्याची त्यांना जाणीव झाला नाही, झोपेत श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी जेव्हा अंबाच्या सासूने झोपडीचा दरवाजा उघडला तेव्हा तिघेही मृतावस्थेत आढळले. 
- रिपोर्टमध्ये एका गावकऱ्याच्या हवाल्याने हे सांगण्यात आले की, जेव्हा तिघेही झोपेत होते, तेव्हा त्यापैकी एकाच्या पांघरुणाला आग लागली होती, याचा धूर भरून मायलेकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. 
- चीफ मेडिकल ऑफिसर चेतराज बराल यांच्या मते, तिन्ही मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिस पथकही घटनास्थळाची पाहणी करत आहे.

 

छौपदी प्रथेमुळे गेला जीव
- नेपाळमध्ये शतकांपासून छौपदी प्रथा सुरू आहे. छौपदीचा अर्थ आहे अस्पृश्य. या प्रथेअंतर्गत पीरियड वा डिलिव्हरीमुळे महिलांना अपवित्र ठरवले जाते.
- यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने लादली जातात. त्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. पालकांना स्पर्श करू शकत नाहीत. स्वयंपाक करू शकत नाहीत, मंदिर वा शाळेत जाऊ शकत नाहीत.
- प्रथेनुसार, ऑगस्टमध्ये येणाऱ्या ऋषि पंचमीच्या दिवशी महिला अंघोळ करून स्वत:ला पवित्र करतात. यासोबतच आपल्या पापांसाठी माफीही मागतात. छौपदी प्रथेला नेपाळ सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये बेकायदेशीर ठरवले होते, परंतु तरीही ही प्रथा सर्रास देशभरात पाळली जाते.

 

बातम्या आणखी आहेत...