आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Married Woman And Her Lover Arrested For Killing Husband In Jharkhand Crime News In Marathi

हत्येच्या दिवशी प्रियकरावर भारी पडला होता पती, तेव्हा पत्नीने डोळ्यांत टाकली मिरचीपूड; मग असे रचले आत्महत्येचे नाट्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - सद्यस्थितीला झारखंडमध्ये सर्वात चर्चित असलेल्या खूनाचा पोलिसांनी अखेर छळा लावला. पोलिसांनी किशनच्या हत्येप्रकरणी त्याची दुसरी पत्नी रूबी आणि रूबीचा प्रियकर काशी या दोघांना शनिवारी अटक केली. रूबीने आपल्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी तसेच काशीसोबत विवाह करण्यासाठी हा कट रचल्याची कबुली दिली. संपूर्ण प्रकरणात तीच मुख्य सूत्रधार होती. यात पतीला कुठे बोलवायचे, कसे मारायचे, कशाने मारायचे आणि हत्या झाल्यानंतर काय करावे याची सगळीच प्लॅनिंग तिने केली होती. आरोपी पत्नीने आपली आपबिती पोलिसांसमोर मांडली आहे. यात तिने स्वतःलाच पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला.


वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, मद्यपी पती करायचा मारहाण
पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. रुबीचा विवाह वयाच्या 14 व्या वर्षी धनबादच्या एका ग्रामीण भागात राहणाऱ्या किशनसोबत झाला होता. रूबी किशनची दुसरी पत्नी होती. वयात कमालीचा अंतर असल्याने दोघांमध्ये कधी जमलेच नाही. त्यातच मद्यपी असलेला किशन रोज रात्री दारू पिऊन घरात धिंगाणा घालायचा. दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण हे रोजचेच झाले होते. नशेत अनेकवेळा त्याने रूबीचा लैंगिक छळ केला. रूबीचे आयुष्य अक्षरशः नरक बनले होते. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने माहेरी जाण्याचा ती विचारही करू शकत नव्हती. दूर-दूरपर्यंत तिला आशेचा किरण दिसत नव्हता.


सहानुभूती दाखवणाऱ्या शेजारच्या तरुणावर जडले प्रेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या अत्याचाराला कंटाळलेली रूबी काही महिन्यांपूर्वीच गावात राहणाऱ्या एका युवकाच्या संपर्कात आली. काशी असे त्या युवकाचे नाव होते. दोघांचे वय देखील 20 वर्षांच्या आतलेच. रूबीने आपल्यावर झालेल्या अत्याचारांची हकीगत काशीसमोर मांडली. तेव्हा काशीने तिला दिलासा दिला. सहानुभूतीच्या रुपात सुरू झालेले हे नाते अनैतिक संबंधांमध्ये परिवर्तित झाले. समवयीन असलेल्या काशीसोबत रूबी इतकी रमली होती की त्याच्याशी विवाह करण्यासाठी ती काहीही करण्यास तयार होती. त्यातच, दोघांमध्ये सुरू असलेले गुप्त मोबाईल संभाषण पती किशनच्या हाती लागले. आपली पत्नी रोज रात्री 1 ते 3 वाजेच्या सुमारास एका तरुणाशी बोलत असल्याचे त्याला कळाले होते. त्या दिवशी किशनने रूबीला अमानुष मारहाण केली. यानंतर तिच्या प्रियकाराचा शोध घेण्यासाठी तो हात धुवून मागे लागला. याच दरम्यान रूबीने किशनचा काटा काढण्याचा डाव रचला.


हत्येच्या दिवशी प्रियकरावर भारी पडला होता किशन...
> रूबीला मारहाण करत असताना किशनने तिच्या प्रियकराला भेटण्याचा हट्ट धरला होता. पतीचा हाच हट्ट पूर्ण करताना रूबीने हत्येचा संपूर्ण षडयंत्र रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीच्या काही दिवसांतच रूबीने आपल्या प्रियकराशी संवाद साधला आणि प्लॅनिंगनुसार आपला पती किशनला भागाबांध येथील तलावाजवळ आणणार असल्याचे सांगितले. 27 मे रोजी तिने कटानुसार किशनला घटनास्थळी नेले. परंतु, त्या दिवशी काशी त्या ठिकाणी आलाच नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी 28 मे रोजी ती पुन्हा किशनला घेऊन त्याच ठिकाणी पोहोचली.
> रूबीने किशनला गळफास देण्यासाठी दोरी आपल्या पदरात लपवून आणली होती. काशी दिसताच किशन संतापला आणि दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. रूबीने किशनचा गळा आवळण्यासाठी एक दोरी आपल्या पदरात लपवून आणली होती. संधी मिळताच तिने ती दोरी काशीच्या हातात दिली. काशीने ती दोरी पती किशनच्या गळ्यावर गुंडाळली आणि मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, वयाने मोठा असलेला किशन काशीवर भारी पडला. त्याने आपल्या गळ्याभोवती गुंडाळलेली दोरी काढून काशीच्या गळ्यावर लावली आणि त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली.
> यावेळी रूबीने आपल्यासोबत आणलेली मिरचीपूड पती किशनच्या डोळ्यांत टाकली. किशन डोळे पुसताना काशीने पुन्हा ती दोरी घेतली आणि काशीचा गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर अगदी हुशारीने काशी आणि रूबीने किशनचा मृतदेह झाडाला लटकवला. यानंतर आपल्या पतीने आत्महत्या केल्याचा ढोंग केला. पोलिसांनी दोघांचे कॉल रेकॉर्ड काढले आणि कसून चौकशी केली. याच दरम्यान दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...