आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Married Woman Burns Teen Genitals With Hot Tongs For Resisting Her Sexual Advances

सेक्ससाठी विवाहितेने 13 वर्षीय मुलाला ठेवले ओलीस, नकार देताच गरम चिमट्याने जाळला प्रायव्हेट पार्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा - दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा परिसरात वासनेत आंधळ्या झालेल्या महिलेचे पाशवी कृत्य समोर आले आहे. या महिलेने आपली शारीरिक गरज भागवण्यासाठी अवघ्या 13 वर्षांच्या मुलाला आपल्या घरात बंधक बनवून ठेवले. त्याने जेव्हा सेक्स करण्यास नकार दिला, तेव्हा या महिलेने गरम-गरम चिमट्याने त्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट जाळला. ग्रेटर नोएडातील छप्रौला गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सध्या फरार असून तिचा कसून शोध घेतला जात आहे. 


शेजारीच राहत होती महिला...
पीडित 13 वर्षीय मुलाच्या आईने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहितेच्या विरोधात पोलिसांत मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. आईने सांगितल्याप्रमाणे, वयाच्या विशीत असलेली शेजारील विवाहिता नेहमीच त्या मुलाला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने घरी बोलवायची. पीडिताच्या आईने त्या महिलेला आपल्या मुलासोबत अश्लील वर्तन करताना अनेकदा पाहिले होते. यामुळे मुलाची आई आणि त्या महिलेत काही वेळा भांडणे सुद्धा झाली. तरीही विवाहितेने त्या मुलाचा पाठलाग सोडला नाही. तक्रारीनुसार, याच शुक्रवारी त्या महिलेने अश्लील चाळे करून त्या मुलाला आपल्याकडे आकर्षित केले. यानंतर ती त्याला आपल्या घरात घेऊन गेली आणि त्याच ठिकाणी दिवसभर ओलीस ठेवले. तरीही मुलाने सेक्स करण्यास नकार दिला. तेव्हा विवाहितेने त्याचा प्रायव्हेट पार्ट गरम चिमट्याने जाळला. पीडित मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानेच आईला आपल्यावर बेतलेली घटना सांगितली. 


सर्वच बाजूंनी तपास करणार -पोलिस
ही घटना घडली तेव्हापासूनच महिला पसार आहे. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी महिलेच्या विरोधात शस्त्राने वार करणे, बेकायदेशीर कृत्य, अपहरण आणि गुन्हेगारी षडयंत्र इत्यादी आरोप दाखल केले आहेत. यासोबतच पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने महिलेच्या विरोधात बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा POCSO अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना शुक्रवारी घडली. तरीही पीडित मुलाच्या आईने इतक्या उशीरा तक्रार का दाखल केली असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे, या घटनेचा सर्वच बाजूंनी विचार केला जाणार असे पोलिसांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...