आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठ असल्यामुळे सासरचे सतत मारायचे टोमणे, मानसिक तणावात येऊन विवाहितेने केली आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- विवाहितेला लठ्ठ असल्यामुळे सासरचे लोक नेहमी टोमणे मारायचे. या सततच्या टोमण्यांना कटांळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

 

मुळ फलटणची रहिवासी असलेली प्रियांका पेटकर हिचे चार वर्षांपूर्वी केदार पाटेकरसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून प्रियांकाला 'तू जाड आहेस, घटस्फोट दे, माहेरातून पैसे घेऊन' ये अशा पद्धतीचे टोमणे आणि त्रास दिला जायचा. या त्रासाला कंटाळून प्रियांकाने गळफास घेत आत्महत्या केली. लठ्ठ असण्यावरून वारंवार टोमणे व दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी पती केदार पाटेकर आणि त्याच्या आई-वडिलांसह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...