आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: अनोळखी ट्रकमधून जात होते कुटुंब, पति अन् मुलासमोरच नराधमांनी लुटली अब्रू, बेदम मारून पैसेही लुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यात अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कायदा व सुव्यवस्था नावालाच उरल्याचे दाखवून देणाऱ्या या घटनेत चालत्या ट्रकमध्ये एका महिलेवर पती अन् मुलांसमोरच गँगरेप करण्यात आला. जेव्हा महिलेच्या पती अन् मुलांनी विरोध केला, तेव्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

 

पीडिता ही पती आणि मुलांसोबत गुडगावला जात होती 
इटावाच्या बटेश्वरमधून एक व्यक्ती आपल्या पती आणि मुलांसोबत मोठ्या मुलाला भेटण्यासाठी ट्रकमधून जात होते. तेवढ्यात वाटेत 3 बदमाश स्वार झाले. पहाटे 3 वाजता ट्रक रिफायनरी परिसरातील चौकीजवळ पोहोचला, तेव्हा 3 युवकांनी ट्रक थांबवला आणि स्वार म्हणून बसले. ट्रक जसा पुढे निघाला तेव्हा बंदुकीच्या धाकावर नराधमांनी दांपत्याला मारहाण करून पैसे लुटले. यानंतर आरोपींनी महिलेची छेडछाड सुरू केली. जेव्हा पतीने याचा विरोध केला, तेव्हा महिलेच्या पती आणि मुलांना मारहाण केली आणि त्यांच्या समोरच महिलेवर बलात्कार केला. पूर्ण घटनाक्रमात ट्रक ड्रायव्हरचे म्हणणे आहे की, त्यानेही विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मलाही बेदम मारहाण केली.

 

आरोपींनी बलात्काराच्या घटनेनंतर हरियाणा बॉर्डरवर पीडितेला पती व मुलांसहित उतरवले. यानंतर पीडितेच्या पतीने पोलिसांना सूचना दिली आणि पूर्ण घटनेची माहिती सांगितली. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या पतीला मथुरामधील कोसी पोलिस स्टेशनला पाठवले आहे. घटनास्थळ मथुरा आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी छापेमारी केली जात आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video...  

 

 

बातम्या आणखी आहेत...