आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Married Woman Molested By Neighbor On 31st Night In Jaipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्टी फर्स्टच्या पार्टीत दंग होता पती, इकडे शेजाऱ्याने पत्नीसोबत केले असे काही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - 31 डिसेंबरच्या रात्री देशभरात ठिकठिकाणी जल्लोष सुरू होता. मित्रकंपनी मद्याचे प्याले रिचवत बसलेली होती. अशातच 31stच्या रात्री पती एकीकडे पार्टीत दंग असताना शेजाऱ्याने घरात घुसून पत्नीवर बलात्कार केला. पती जेव्हा न्यू इयर सेलिब्रेट करून परतला तेव्हा पत्नीने त्याला सर्व प्रसंग सांगितला. यावर पतीने पत्नीसह पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

असे आहे प्रकरण...
पोलिसांच्या माहितीनुसार, 26 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसोबत सांगानेरमध्ये किरायाने राहते. 31 डिसेंबरच्या रात्री महिलेचा पती न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये गेला. इकडे महिला घरात एकटी असल्याची संधी साधून शेजारी वेदप्रकाश घरात घुसला. त्याने दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केला. कुणाला काही सांगितलेस तर जिवाला मुकशील अशी धमकीही दिली.

 

आरोपी शेजारी फरार...

इकडे न्यू इयर सेलिब्रेट करून पती घरी पोहोचला तेव्हा त्याला पत्नीने सर्वकाही सांगितले. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपास केल्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.