आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: बाहेर पती अन् सासरा बसलेले; आतमध्ये मांत्रिकाने केला विवाहितेवर अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटिहार (बिहार) - मूल व्हावे म्हणून एक महिला मांत्रिकाकडे अंगारे-धुपारे करण्यासाठी पती आणि सासऱ्यासोबत गेली होती. मांत्रिकाने तंत्रविधीच्या नावावर महिला खोलीत बोलावले आणि तिच्या पती व सासऱ्याला बाहेरच बसवले. विवाहितेवर बलात्कार केल्यानंतर नराधम मांत्रिक घटनास्थळावरून पसार झाला. ही धक्कादायक घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आहे.

बिहारच्या कटिहारमध्ये एका ढोंगी मांत्रिकाच्या कृत्याचा भंडाफोड झाला आहे. एका मांत्रिकाने निःसंतान महिलेला मूल होण्यासाठी दैवी उपचार करतो असे म्हणून एकांतात वासनेची शिकार बनवले. कटिहारजवळील अमदाबादच्या पालटोला गावातील ही घटना आहे. येथे एका विवाहितेला मूल होत नव्हते. तिने अनेक उपचार केले, पण काहीच फायदा होत नव्हता. यादरम्यान एका परिचिताने त्यांना मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला.


वासनांध मांत्रिकाने केला रेप...
हाही उपाय करून पाहू म्हणून एका दिवशी महिलेने आपला पती आणि सासऱ्यासोबत मांत्रिक मनीराम पाल ऊर्फ कालू पाल याचे ठिकाण गाठले. भोंदू मांत्रिकाने जादूटोणा आणि जडीबुटीचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेच्या कुटुंबीयांना खोलीबाहेर बसवले. तो महिलेला एकटीच रूममध्ये घेऊन गेला आणि मग तिला गुंगीचे औषध पाजून रेप केला. यानंतर भोंदू मांत्रिक घटनास्थळावरून फरार झाला.

 
पीडितेने पतीला सांगितला घडलेला प्रसंग...
विवाहितेला जेव्हा थोडी शुद्ध आली तेव्हा तिने पती व सासऱ्याला सर्व घटना सांगितली. हे ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्या मांत्रिकावर विश्वास ठेवून चमत्काराच्या अपेक्षेने गेले होते, त्यानेच हे कुकृत्य केले होते. यानंतर लगेचच पीडितेने तिच्या पती व सासऱ्यासोबत जवळचे पोलिस ठाणे गाठले.

 

मांत्रिकाला अटक, तुरुंगात डांबले
पोलिसांनी मांत्रिकाद्वारे विवाहितेवर मूल होण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर लगोलग पथके पाठवून छापेमारी सुरू केली. फरार मांत्रिकाला शिताफीने पकडून पोलिसांनी त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आरोपी मांत्रिकाचा फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...