आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउदयपूर (राजस्थान) - वेळेवर कर्ज मिळाले की संकटे टळतात, परंतु अनेकदा हाच कर्जाचा पैसा माणसाला नरकात ढकलत असतो, जेथून बाहेर निघणे खूप कठीण होऊन बसते. उदयपुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पतीने घरासाठी काढले 28 लाखांचे कर्ज
हिरणमगरीचा रहिवासी एक व्यक्ती मार्केटिंगचे काम करतो. त्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी 28 लाख रुपयांचे घर हप्त्याने घेतले होते. घर खरेदी केल्यानंतर सावकारांनी त्याच्यावर पैशांसाठी दबाव टाकायला सुरुवात केली.
कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीला सांगितली आयडिया...
सावकारांचा पैसा फेडण्यात असमर्थ ठरल्यामुळे तो सारखा तणावात राहू लागला. यानंतर त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की, ज्यामुळे अख्खे कुटुंबच बरबाद झाले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, सावकारांना घरी बोलवून कर्जाच्या हप्त्याच्या बदल्यात त्यांच्याशी संबंध ठेव. पतीचे एवढे घाणेरडे विचार ऐकून पत्नीने त्याला तत्काळ नकार दिला. यानंतर त्याने पत्नीला जबर मारहाण केली. मग अचानक एका दिवशी पतीच्या गैरहजेरीत सावकारा घरी येऊन धडकले. त्यांनी महिलेची छेड काढली. पती आणि कुटुंबावरील संकट पाहून महिलेनेही मजबुरीने आपली अब्रू सावकारांच्या स्वाधीन केली.
एकदा अब्रू लुटल्यावर, नराधमांची वाढली हिंमत
एकदा बलात्कार केल्यावर सावकारांची हिंमत वाढली. आता ते सारखे तिला वासनेची शिकार बनवू लागले. परंतु मग तर हद्दच झाली. सावकारांनी महिलेच्या बलात्काराचा एक व्हिडिओ शूट करून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करू लागले. नराधमांची महिलेच्या मुलीवरही वाईट नजर गेली. तिला आपल्या मुलीवर नराधमांची सावलीही पडू द्यायची नव्हती.
4 सावकार अन् पतीवरही दाखल झाला गुन्हा...
यामुळे महिलेने हिंमत करून पोलिसांसमोर सर्व घटना सांगितली. सावकार अशोक, प्लू, कीर्तेश, भागेश आणि कुशाल यांच्या कुकृत्याचा पाढा तिने पोलिसांपुढे वाचला. तिने पोलिसांना सांगितले की, या नराधमांनी तिची एक-दोन वेळा नव्हे, तर अनेक वेळा अब्रू लुटली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कारवाई सुरू केली. सर्वांवर बलात्कारासहित ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेच्या पतीवर वेगळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.