आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या खून प्रकरणातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न, राजीव गांधी भवनसमोर घेतले विषारी औषध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-  कॉलेजरोडवरील एका इमारतीच्या छतावर पत्नीचा गळा आवळून खून करत फरार झालेला संशयित पती जयेश दामोधर याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. ११)  दुपारी राजीव गांधी भवनसमोर हा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने संशयिताला वाचवण्यात यश आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ८) मध्यरात्री पायल नावाच्या युवतीचा मृतदेह सत्यम लीला इमारतीच्या छतावर सापडला होता. पायलची आई सरला परदेशी यांच्या तक्रारीनुसार, तिचा प्रियकर जयेश रामचंद्र दामोधर (वय २३, रा. पंचवटी) याने तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार गंगापूर पोलिसांना दिली होती. संशयित जयेशच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासून तो फरार होता. पथक त्याचा शोध घेत होते. दुपारी तो पंचवटीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राजीव गांधी भवनसमोर अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ वरिष्ठ निरीक्षक कड यांना कळवले. त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तत्काळ उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गंगापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समीर वाघ यांच्या ताब्यात संशयिताला देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...