आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेने घरकामासाठी ठेवली मोलकरीण, पण काही दिवसांनीच ती पतीसोबत मिळून करू लागली 'हे' काम, जगणे केले कठीण!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्या बंगळुरूतून एका व्हिडिओसाठी बिझनेसमनला ब्लॅकमेल करून 60 लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. 6 जणांच्या एका टोळीने एका पोर्न व्हिडिओत बिझनेसमनच्या पत्नीची मॉर्फ करून इमेज लावली आणि मग ते विवाहितेला ब्लॅकमेल करू लागले. 18 महिने सुरू असलेल्या या ब्लॅकमेंलिंगमध्ये नराधमांनी महिलेकडून मोठी रक्कम वसूल केली. टोळीच्या सदस्यांनी जेव्हा बिझनेसमनच्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा महिलेने सर्व बाबा पती आणि कुटुंबीयांना सांगितली. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. सूत्रांनुसार, या गँगमध्ये सामील महिला पीडितेच्या घरीच मोलकरणीचे काम करत होती.

 

व्हिडिओ दाखवून उकळले पैसे
- महिलेच्या तक्रारीनुसार, तिने 2016 मध्ये प्रकाशनगरात राहणाऱ्या लक्ष्मी नावाच्या एका मोलकरणीला कामावर ठेवले. त्याच लक्ष्मीने तिचे मित्र पवित्र आणि पती प्रशांत यांच्यासोबत मिळून मालकिणीकडून पैसे उकळण्याचा कट रचला.
- तक्रारीनुसार, या तिघांनी आणखी 3 जणांसोबत मिळून एका पोर्न व्हिडथ्ओत मॉर्फ करून मालकिणीचे फोटोज आणि व्हिडिओज वापरले. यांनतर त्यांनी हा व्हिडिओ मालकिणीला दाखवला.
- हा व्हिडिओ पाहून मालकीण घाबरली. याचा फायदा उचलून त्यांनी महिलेला पैशांची मागणी केली. त्यांनी धमकी दिली की, पैसे मिळाले नाहीत, तर व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करू. 
- महिलेने टोळीची डिमांड पूर्ण करण्यासाठी आपले दागदागिनेही विकून टाकले. पैसे मिळाल्याने या टोळीचा आत्मविश्वास उंचावला, यासाठी ते घरातही येऊ लागले.
- एवढेच नाही, टोळीची नजर महिलेच्या मुलीवरही गेली. ते तिलाही त्रास देऊ लागले. पीडितेची मुलगी एमबीबीएस करत आहे. ती जेव्हा कॉलेजसाठी निघायची, तेव्हा कॉलेजचे सदस्य तिच्यामागे निघायचे.

 

या घटनेनंतर महिलेने पतीला सर्व काही सांगितले
- पोलिसांनी सांगितले की, दोन अज्ञातांनी महिलेच्या मुलीचा कॉलेजपर्यंत पाठलाग केला, यानंतर ते मुलीला म्हणाले की, तू तुझ्या आईला लक्ष्मी मोलकरणीला पैसे देण्यासाठी भाग पाड. 
- या घटनेनंतर महिलेने याबाबत आपल्या पतीला सांगण्याचा निर्णय घेतला. तथापि, तोपर्यंत 18 महिन्यांत तिने या या टोळीला 60 लाख रुपये दिलेले होते. पोलिस केस दाखल होण्याआधी महिलेने कुटुंबीयांशीही संवाद साधला.

 

सर्व आरोपी फरार 
- यानंतर महिलेकडून सेंट्रल क्राइम ब्रँचमध्ये तक्रार दाखल झाली. सीसीबीने हे प्रकरण राजाजीनगर स्थानिक पोलिस ठाण्यात ट्रांसफर केले आहे.
- पोलिस ऑफिसर म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक, गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...