आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराच्या जाचाला कंटाळून वहिनीची आत्महत्या; तळवेलमधील विवाहितेने घेतली विहीरीत उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वरणगाव : दिराच्या जाचाला कंटाळून वहिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता तळवेल (ता.भुसावळ) येथे उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दिराविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. 


संतोष नेटके यांचा लहान भाऊ राजू नेटके यांच्यात लहान मुलांच्या भांडणावरून वाद निर्माण झाला. या भांडणात राजूने त्याची वहिनी दुर्गा नेटके यांच्याशी हुज्जत घालत लज्जास्पद वर्तन केले. याचे वाईट वाटल्याने दुर्गा घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता महामार्गालगत असलेल्या सोपान तुकाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.हेडवे यांनी शवविच्छेदन केले. मृत दुर्गा नेटके यांची बहिण अंजली गणेश वानखडे यांच्या फिर्यादीवरून राजू वामन नेटके या दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली आहे. एपीआय सारिका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव तपास करत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली. 
 

बातम्या आणखी आहेत...