आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू, नातलगांनी केला हत्येचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - वीसवर्षीय विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील भाळवणी येथे घडली. दरम्यान, विवाहिता विहिरीत पडली की तिने आत्महत्या केली, याबाबत संभ्रम असताना माहेरच्या मंडळींनी घातपाताचा आरोप केला आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत शवविच्छेदन रखडले होते. 

 

भाळवणी येथील राधा महेश दहे (२०) यांचा नऊ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. बीड तालुक्यातील मंझरी हे त्यांचे माहेर आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी शेतातील विहिरीत त्या पडून त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. 

 

मृत्यूविषयी नातलगांनी व्यक्त केली शंका 
दरम्यान, राधा यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली की त्यांना विहिरीत ढकलण्यात आले, याबाबत उशिरापर्यंत रुग्णालय पोलिस चौकीत नोंद नव्हती. मात्र त्यांच्या माहेरकडच्या मंडळींनी महेश दहे यांनी त्यांना विहिरीत ढकलल्याचा आरोप केला होता. उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. संतप्त नातेवाइकांनी काळी वेळ शवविच्छेदनही रोखले होते. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...