अहवाल / विवाहित महिला 'लिव्ह इन' रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा अधिक सुखी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी जारी केला अहवाल

पुण्यातील 'दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा'ने केला सर्व्हे

Sep 22,2019 03:24:00 PM IST

मुंबई- राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, विवाहित महिला या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा जास्त सुखी असतात, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संघटनेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्व्हेनुसार विवाहित महिलांच्या सुखा-समाधानाची पातळी अधिक असते, तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिला तुलनेने कमी सुखी असतात. पुण्यातील 'दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा'ने केलेल्या सर्व्हेनंतर राजस्थानमधील पुष्करला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित सर्वेक्षणावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष मोहन भागवत मंगळवारी मीडियाशी संवाद साधल्यानंतर जाहीर केला.

X