आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेने मारली होती नदीत उडी; तरुणाने जीवाची पर्वा न करता वाचविले महिलेचे प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- आत्महत्येसाठी उंच पूलावरून तापी नदीपात्रात उडी मारणाऱ्या धुरखेड्याच्या 30 वर्षीय विवाहितेला ग्रामपंचायत सदस्य असलेल्या युवकाने वेळीच धाडस दाखवून वाचवले. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता पिंप्री नांदू-निंभोरा सिम रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावर घडली.

 

धूरखेडा (ता.रावेर) येथील विवाहित महिला सोमवारी दुपारी तापी नदीवरील पिंप्री नांदू-निंभोरासीम रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावर आली. यानंतर 2.30 वाजेच्या सुमारास तिने सुमारे 100 फूट उंच पुलावरून थेट नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार पुलावरून ये-जा करणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आला. यामुळे वाचवा..वाचवा अशी आरडाओरड सुरू झाली. हा प्रकार सुरू असताना मासेमारी करणारे धूरखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर बेलदार तेथून जात होते. महिलेने तापीत उडी घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. अवघ्या काही मिनिटात ज्ञानेश्वरने बुडणाऱ्या महिलेला तापी नदीतून सुखरुप बाहेर काढले. या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले. दरम्यान, नदीत उडी घेण्यापूर्वी महिलेने चिठ्ठी लिहून ती पुलाच्या कठड्यावर ठेवली होती, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

आतापर्यंत 13 महिलांना वाचवले
धूरखेडा येथील ज्ञानेश्वर बेलदार यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आतापर्यंत तेरा महिला व पुरुषांना नदी पात्रातून जिवंत काढले आहे. एखाद्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासारखे दुसरे पुण्य नाही. याचे आत्मिक समाधान मिळते, असे ज्ञानेश्वर बेलदार यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.