आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न... पण एका छोट्या गोष्टीसाठी विवाहितेची केली निर्घृण हत्या..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - बिहारच्या पाटण्यात सासरच्या मंडळींनी एका नवविवाहितेची फक्त एका सोन्याच्या चेनसाठी गळा दाबून हत्या केली. मृत विवाहितेचे नाव रूपा कुमारी आहे. रूपा यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले होते, परंतु हुंड्याच्या लोभापायी त्यांनी तिची हत्या केली. रूपाचे वडील जितेंद्र पासवान म्हणाले की, लग्नादरम्यान त्यांनी ऐपतीपेक्षा जास्त हुंडा देऊन लग्न लावले होते. यानंतरही फक्त सोन्याच्या एका चेनसाठी त्यांनी मुलीची हत्या केली. ही घटना रानीतालाबमधील धाना गावातील आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी 5 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...