आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू, नणंदेच्या त्रासामुळे चाकोरा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चाकोरा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेने रविवारी (दि. ३) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सासू व ननंदेच्या त्रासामुळेच बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप करून भावाने दिलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


ज्योती मंगेश साखरकर (२७) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ज्योती यांचा पाच वर्षांपूर्वी मंगेश साखरकर यांच्यासोबत विवाह झाला होता. दरम्यान, या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. रविवारी सायंकाळी घरातच ज्योती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे ही माहिती तातडीने लोणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला होता. ज्योती यांचे पती मंगेश हे कामासाठी सूरतला राहतात. त्यामुळे ज्योती व त्यांची मुल चाकोरा येथे सासूसोबत राहत होती. अधूनमधून मंगेश चाकोरा येथे घरी यायचे. रविवारीसुद्धा ते चाकोरा येथे आलेले होते. ज्योतीला मागील काही महिन्यांपासून सासू शोभा साखरकर व नणंद रुपाली बांडे या त्रास देत होत्या, त्यांच्याच सततच्या मानसिक व शारिरीक जाचाला कंटाळून माझ्या बहिणीने आत्महत्या केली, असा आरोप मृतक ज्योती यांचे भाऊ अंकुश राजेंद्र काजे (३२, रा. पुसनेर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी अंकुश काजे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सासू व नणंदेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती लोणी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत. दोन्ही बाजू तपासून पुढील निर्णय होणार आहे, असे सांगितले. 
मृतकच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल 
 

बातम्या आणखी आहेत...